नुतन वर्षाचा एकच संकल्प..!

- अबालवृद्ध व महिलावर्गाचा आरोग्य व शरीर सुदृढतेसाठी  "एमएमए मॅट्रिक्स जिम"चाच सर्वोत्तम पर्याय : सभासद सदस्यांनी व्यक्त केल्या भावना

  1. नुतन वर्षाचा एकच संकल्प..!
– अबालवृद्ध व महिलावर्गाचा आरोग्य व शरीर सुदृढतेसाठी  “एमएमए मॅट्रिक्स जिम”चाच सर्वोत्तम पर्याय : जिमचे सभासद सदस्यांनी व्यक्त केल्या भावना

– मुंबई पुण्यानंतर कोल्हापुरात राजारामपुरी ७ वी गल्ली येथे महिला, अबालवृद्ध नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात 2020 सालापासून सुरू आहे अद्ययावत जिम

– आजअखेर सुमारे चार ते पाच हजार लोकांना मिळाला जिमचा लाभ

– आंतरराष्ट्रीय दर्जाचे, अद्ययावत व बायोमेकॅनिकली करेक्ट मशिनरी व जिम इन्स्ट्रुमेंट

– तज्ञ प्रशिक्षकांची टीम, आहार तज्ञ व फिटनेस टेस्ट यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)

नवीन वर्ष 2024 चे स्वागत.. नवी संकल्पना… नुतन वर्षाचा अबालवृद्ध व महिलावर्गाचा एकच संकल्प…आरोग्य व शरीर सुदृढतेसाठी “एमएमए मॅट्रिक्स जिम”मध्येच घेणार प्रवेश. अशा भावना जिमचे सभासद व सदस्यांनी व्यक्त केल्या.

– कोल्हापुरात राजारामपुरी ७ व्या गल्लीत 2020 सालापासून यशस्वी वाटचाल 

देशपातळीवर नावलौकिक कमविलेल्या एमएमए मॅट्रिक्स जिमची देशभर सेंटर आहेत. मुख्य सेंटर मुंबई येथे असून याचे संस्थापक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ आहेत. या जिममध्ये अध्यायावत जिम साहित्य व तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार तंत्रशुद्ध व्यायाम करून घेतला जातो. मुंबई पुण्यानंतर कोल्हापुरात एकमेव राजारामपुरी ७ वी गल्ली येथे 2020 सालापासून यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंटर उभारण्याचा संकल्प एमएमए मॅट्रिक्स जिमच्या व्यवस्थापनाने केला आहे. त्यानुसार पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पातळीवर दुबई येथे सेंटर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे., अशी माहिती जिम व्यवस्थापनाने दिली आहे.

– सुमारे चार ते पाच हजार लोकांना या जिमचा मिळाला लाभ

कोल्हापुरात सेंटर सुरू झाल्यापासून सुमारे चार ते पाच हजार लोकांना या जिमचा शरीर सुदृढ व आरोग्यदायी बनविण्यासाठी / फिटनेस कमविण्यासाठी लाभ झाला आहे. यामध्ये पाच वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतच्या अबालवृद्धांचा समावेश आहे.

– महिलांसाठी स्पेशल हॅप्पी अवर्स बॅजची सोय…

सध्या जिममध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक लोकांनी नोंदणी केली असून दररोज सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा व्यायाम सुरू आहे. नोंदणी केलेल्या सभासदांना दिवसभरातील कोणत्याही वेळेत व्यायाम करता येतो. महिलांसाठी सकाळी अकरा वाजता “स्पेशल हॅप्पी अवर्स बॅज”ची सोय आहे.

– लहान मुले व महिलांसाठी विशेष तंत्रशुद्ध प्रशिक्षण…

जिममध्ये लहान मुले व महिलावर्गासाठी तज्ञ प्रशिक्षकांमार्फत विशेष तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये एम एम ए मिक्स मार्शल आर्ट्स, जुदो, कराटे, तायक्वांदो, बीजेजे, ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन, बॉलीवूड, झुम्बा डान्स, निसर्ग सहल आदींचा समावेश आहे.

– महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे…

महिलांना आत्मसंरक्षणाचे (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षणही तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येते. तसेच फिटनेस टेस्ट, कौन्सिलिंग, मागणीनुसार क्रीडा फिजिओथेरपिस्ट, योग्य आहार याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

– इन्स्ट्रुमेंट आंतरराष्ट्रीय दर्जाचे व बायोमेकॅनिकली करेक्ट…

जिममधील इन्स्ट्रुमेंट आंतरराष्ट्रीय दर्जाचे व बायोमेकॅनिकली करेक्ट असल्यामुळे येथे नवीन व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना दुखापतीची शक्यता कमी असते. व्यायामासाठी असणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये पाठीच्या स्नायूंसाठी इलेव्हेट रोईंग,  मसल बॅलेंसिंगसाठी फक्त आमच्याकडे उपलब्ध असणारे युनीलॅटरल मशीन, ॲथलेटिक्स खेळाडूंसाठी एअर बाईक, ज्येष्ठ नागरिकांसाठी व पाठीचा विकार असणाऱ्यांसाठी सीटिंग सायकल, गिर्यारोहकांसाठी ट्रेड क्लाइंबर, मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी रोइंग, गुडघेदुखी होऊ नये यासाठी अध्ययावत शॉकओझ्बर्वर असणारे सात ट्रेडमिल्स, रबर – मेटल कोटिंगचे डंबेल्स व प्लेट्स के.जी.मध्ये, पोटाचा घेर, चरबी, पाणी लेवल आदींसाठी बीएमआय टेस्ट आदींचा समावेश आहे . जिम दोन वेगवेगळ्या विस्तीर्ण व प्रशस्त अशा फ्लोअरमध्ये उभारण्यात आली आहे.

– अशी आहे एमएमए मॅट्रिक्स जिमची तज्ञ प्रशिक्षकांची टीम …

एमएमए जिमचे ओनर नितीश कुलकर्णी स्वतः आयर्न मॅन
सर्टिफाईड कोच असून यांनी ४ वेळा आयर्न मॅन ही स्पर्धा पूर्ण केली आहे, तसेच ते ओपन वॉटर नॅशनल स्विमर आहेत.  स्टाफला त्यांचे  मोलाचे मार्गदर्शन असते. क्लब मॅनेजर शिवा कणसे, फ्लोअर मॅनेजर धैर्यशील चव्हाण, फ्लोअर सुपरवायझर संदीप ढवळे, ट्रेनर प्रवीण सावंत, मुदस्सर, आकाश, महिला प्रशिक्षक शुभांगी बर्गे, वनिता सोनवणे व अमोल बावडेकर (एमएमए कोच).

प्रतिक्रिया

तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभते :  डॉ.शिरीष पाटील.

जिम प्रशस्त असून आल्हादायक वातावरण आहे. अद्यावत मशिनरी व तज्ञ प्रशिक्षक यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभते. सदृढ व आरोग्यदायी शरीर बनवण्यासाठी योग्य सल्ला मिळतो.

वजन नियंत्रित ठेवणे शक्य झाले : उद्योगपती आशिष सिन्हा.

जिम जॉईन केल्यापासून वजन नियंत्रित ठेवणे शक्य झाले. तज्ञ प्रशिक्षकांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभते.  जिममध्ये  चांगले वातावरण  व स्वच्छता असल्याने जास्त काळ व्यायाम होतो.

व्यायामाबरोबर योगा व ध्यानधारणा करता येते : अँड. प्रमोद दाभाडे.

जिममध्ये अद्यावत इन्स्ट्रुमेंट, जिम मशिनरी अल्हाददायक वातावरणात व्यायाम होतो.  तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाबरोबर योगा व ध्यानधारणा करता येते.  सुदृढ बनवण्यासाठी तज्ञ प्रशिक्षकांमुळे योग्य प्रशिक्षणाचा लाभ मिळतो.

 

You may also like

error: Content is protected !!