अबॅकस स्पर्धेत “श्रीयश ” प्रथम
– मान्यवरांच्या हस्ते स्पोर्ट्स सायकल व पारितोषिक देऊन गौरव
– अबॅकस जिल्हास्तरीय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
– परीक्षेसाठी 200 हून अधीक विद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर : (” लोकमानस न्यूज 4 ” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
अबॅकस जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेल्या आयडीयल स्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीयश प्रमोद पाटील याचा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत पितालीया (लेखक आणि प्रेरक वक्ता) व प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वर्षा कृष्णा परीट (सिनियर ऑडिटर कोल्हापूर महानगर पालिका, कोल्हापूर) आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्याला स्पोर्ट्स सायकल भेट देण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 200 हून अधीक विद्यार्थी बसले होते. त्यामधून त्याची निवड करण्यात आली.
यश अबॅकस पट्टनकोडोली यांच्यामार्फत पारितोषिक वितरण
पट्टन कोडोली येथे चैरमन वसंत राऊ बोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत उत्तुंग यश मिळविलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यश अबॅकस पट्टनकोडोली यांच्यामार्फत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
परीक्षेसाठी 200 हून अधीक विद्यार्थ्यांचा सहभाग
यश अबॅकसच्या वतीने अबॅकस जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेल्या आयडीयल स्कूलचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीयश प्रमोद पाटील याचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्याला स्पोर्ट्स सायकल भेट देण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 200 हून अधीक विद्यार्थी बसले होते. त्यामधून त्याची निवड करण्यात आली.
अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती अशी
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन प्रशांत पितालीया (लेखक आणि प्रेरक वक्ता), प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती वर्षा कृष्णा परीट (सिनियर ऑडिटर कोल्हापूर महानगर पालिका कोल्हापूर, अरूण पांडुरंग पाटील (वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 1 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली), पी.आर. कुलकर्णी (माजी मुख्याध्यापक एस.पी.हायस्कूल कुरुंदवाड) तसेच सत्कारमूर्ती समृध्दी सिद्राम माडग्याळ, प्रतीक्षा प्रशांत निकम, नेहा विजय चव्हान, राजु अडके, सिध्दी सचिन कुडाळकर आदी उपस्थित होते.
यांनी घेतले विशेष परिश्रम
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वसंत राऊ बोंगाळे, सुनिल वसंत बोंगाळे, दिपाली सुनील बोंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले