समाजा- समाजातील “ऋणानुबंध” आणखीन घट्ट..!
– राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे दिवाळीनिमित्त आयोजित “फराळ” उपक्रमाला सर्व समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
समाज – समाजातील “ऋणानुबंध” आणखीन घट्ट..! निमित्त होते राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे दिवाळीनिमित्त सर्व समाज बांधवांसाठी आयोजित “फराळ” उपक्रमाचे.
मंचतर्फे परंपरा राखली कायम ..
दरवर्षी शाहू सलोखा मंचतर्फे दिवाळी या सणानिमित्त कोल्हापुरातील सर्व समाज बांधवांसाठी फराळाचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमामध्ये सातत्य ठेवत मंचतर्फे परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या वर्षीही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत फराळ करून समाज – समाजामधील “ऋणानुबंध” आणखी घट्ट केले. शाहू सलोखा मंचतर्फे सोमवारी (दि. 13 नोव्हेंबर 2023) सायंकाळी साडेपाच ते रात्री आठ या वेळेत सर्व समाज बांधवांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन राजर्षी शाहू सलोखा मंचचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाहू सलोखा मंचाच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्वांचे स्वागत मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी केले.
फराळासाठी या मान्यवरांनी लावली उपस्थिती
यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित, कोल्हापूर शहर अभियंता हर्शजीत घाडगे, आर. के. पोवार, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, करवीर तालुका अध्यक्ष राजेंद्र खेराडे, उदय देसाई, प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, अवधूत पाटील, सदानंद दिघे, कुंभार समाजाचे मारुतराव कातवरे, सतीश बाचणकर, उमेश पोर्लेकर, मुस्लिम समाजातील हसन देसाई, डॉ. एम.बी. शेख, बाबा जाफर, कादर मलबारी, जहांगीर अत्तार, रियाज कागदी, समीर काझी, समीर देसाई, मोहसीन खान, सत्यशोधक बँकेचे अध्यक्ष गजानन लिंगम, संधी समाजाचे रमेश तनावानी, आरपीआयचे डि.जे.भास्कर, बाळासाहेब भोसले, बाजीराव नाईक, संभाजीराव जगदाळे, अनिल घाडगे, काका जाधव, संजय काटकर, कमलाकर जगदाळे, रवी पाटील.माळी समाजाचे अशोकराव माळी, ख्रिचन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अशोक पवार, किशोर डवंग, इंद्रजीत माने, प्रतीक साळुंखे, संग्रामसिंह निबळकर, उमेश बुधले, शैलजा भोसले,दीपा डोने, उषा लांडे, संयोगिता देसाई आदींसह विविध समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.