“शिक्षणतज्ञ जे पी नाईक पुरस्कारा” ने वाढवला कलेचा सन्मान..!

- आयसीटीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ जी डी यादव यांच्या हस्ते  कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक, चित्रकार व कलाशिक्षक प्रशांत जाधव यांना पुरस्कार प्रदान

  “शिक्षणतज्ञ जे पी नाईक पुरस्कारा” ने वाढवला कलेचा सन्मान..!

– आयसीटीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ जी डी यादव यांच्या हस्ते  कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक, चित्रकार व कलाशिक्षक प्रशांत जाधव यांना पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : (“लोकमानस न्यूज ४” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

“शिक्षणतज्ञ जे पी नाईक पुरस्कारा”ने वाढवला कलेचा सन्मान..! निमित्त आहे वाय पी पवार रंग मंच प्रायव्हेट हायस्कुल येथे गुरुवार दि 9 नोव्हेंबर 2023 रोजी प्रायव्हेट एजुकेशन सोसायटी आणि माझी विद्यार्थी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात कोल्हापूर आर्ट फाउंडेशनचे समन्वयक, चित्रकार व कलाशिक्षक प्रशांत जाधव यांना “शिक्षणतज्ञ जे पी नाईक पुरस्कार” आयसीटीचे माजी कुलगुरू पद्मश्री डॉ जी डी यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरुण डोंगरे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा व संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक आदी मान्यवरांसह शिक्षकेतर, कर्मचारी उपस्थित होते.

– कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार

कला कौशल्य, व्यासंग, शिक्षण सेवेची कार्यनिष्ठा, शैक्षणिक तसेच कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे, त्यांना यापूर्वी अनेक संस्थांचे विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसेच राज्यस्तरीय स्पर्धा, कला महोत्सव, प्रात्यक्षिक, कार्यशाळा, नवनवीन कलाविषयक उपक्रम यामध्ये त्यांनी प्रामुख्याने कार्य केले आहे. त्याचबरोबर अनेक मासिके वृत्तपत्रे यामध्ये कलाविषयक विपुल लेखन केले आहे.  त्यांचे कोल्हापूरच्या कला नगरीमध्ये कलेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

– सध्या अध्यापक म्हणून कार्यरत…

अतिशय संयमी शिक्षक, विद्यार्थी प्रिय व प्रशासनामध्ये प्रशंसनीय व्यक्तिमत्व म्हणूनही प्रसिद्ध आहेत.  त्यानी एक शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आहे. शिक्षणतज्ञ जे पी नाईक यांचे मौनी विद्यापीठ गारगोटी व प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेस मोलाचे योगदान आहे. मोनी विद्यापीठ गारगोटी येथे प्रशांत जाधव यांचे शिक्षण पूर्ण झाले. यानंतर सध्या ते अध्यापक म्हणून प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत आहेत.

– पुरस्कार प्रेरणादायी अभिमानास्पद… 

शैक्षणिक संस्थांचे प्रणेते असणारे “शिक्षणतज्ञ जे पी नाईक यांचा नावाचा पुरस्कार” मिळणे ही घटना एक प्रेरणादायी अभिमानास्पद आहे. असे भावनिक प्रतिक्रिया पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कार प्राप्त प्रशांत जाधव यांनी व्यक्त केल्या. या पुरस्काराबद्दल प्रशांत जाधव यांचे कला व इतर क्षेत्रातील मित्र परिवारासह विविध स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

You may also like

error: Content is protected !!