“दिवाळी भेट वस्तू” उपक्रम राबविण्यात यश..!
– कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन तर्फे दिवाळीत वृत्तपत्र विक्रेता व एजंट यांना दरवर्षी दिवाळीच्या सणात एक मदतीचा हात
– उपक्रमात सातत्य राखत जोपासली बारा वर्षांची परंपरा : यंदाचे उपक्रमाचे तेरावे वर्ष
– महागाईच्या काळात ही उपक्रमाच्या माध्यमातून कष्टकऱ्यांची दिवाळी बनली आनंददायी
कोल्हापूर : (लोकमानस विशेष प्रतिनिधी : नंदकुमार तेली).
मी करतो गेल्या बारा वर्षांपासून कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन तर्फे वृत्तपत्र विक्रेते व एजंटांसाठी दिवाळी भेटवस्तू हा अनोखा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महागाईच्या काळात ही कष्टकरी वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांची दिवाळी गोड करण्यात संघटनेचा एक मदतीचा हात लावत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे 100 पेक्षा अधिक सभासदांना दिवाळी भेटवस्तूचा लाभ मिळतो यामुळे सभासद व त्यांच्या संघटनेचे कार्य व उपक्रमाबद्दल कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त होत आहे
– उपक्रम ना नफा ना तत्वावर राबवण्यात येतो
यंदाचे उपक्रमाचे हे यशस्वी तेरावे वर्ष दिवाळी भेटवस्तू हा उपक्रम ना नफा ना तोटा या तत्त्वावर राबवण्यात येतो. वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांच्याकडून दरमहा ठराविक निधी भिशीच्या माध्यमातून जमा करून घेण्यात येतो. दिवाळीच्या सणापूर्वी जमा झालेली रक्कम यातून दिवाळी भेटवस्तू खरेदी करण्यात येते. या भेटवस्तूमध्ये दिवाळी सणामध्ये लागणारा फराळ त्या फराळासाठी लागणाऱ्या वस्तू या किराणा दुकानातून होलसेल भावामध्ये खरेदी करण्यात येते. एकदम खरेदी केल्यामुळे महागाईच्या काळात ही कमी दराने किराणा वस्तू उपलब्ध होतात. अप्रत्यक्षपणे भिशीमध्ये पैसे साठत गेल्याने महागाईच्या काळात ही फराळासारख्या खर्चिक वस्तू या मापक दरात मिळत असल्याने संघटनेचा एक मदतीचा हात लाभतो. महागाईची झळ कष्टकरी अंक वृत्तपत्र विक्रेते व एजंटांना पोहोचत नाही या उपक्रमाबद्दल वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय समाधान व्यक्त करत आहेत. यामुळे हा उपक्रम राबविण्याचा उद्देश सफल झाल्याचे समाधान परिश्रम घेणाऱ्या सभासदांना लाभले.
– “दिवाळी भेट” उपक्रम कौतुकास्पद
राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा संघटनेचे संघटक रघुनाथ कांबळे यांनी “दिवाळी भेट” उपक्रमाच्या माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून संघटनेच्या माध्यमातून कोणतीही मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य राहील असे सांगितले सांगितले.
– यांनी घेतले विशेष परिश्रम
दिवाळी भेटवस्तू उपक्रम व संकल्पनेची माहिती देताना व आभार प्रदर्शनावेळी संघटनेचे संचालक सतीश दिवटे यांनी दिवाळी भेट योजनेअंतर्गत मिळणाऱ्या किराणा वस्तू वाटप संकल्पना व आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किरण व्हनगुते, सतीश दिवटे, राजाराम पाटील, अंकुश परब, सुरेश ब्रह्मपुरे आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
– यांची होती प्रमुख उपस्थिती
“दिवाळी भेट ” उपक्रम अंतर्गत फराळासाठी लागणाऱ्या “किराणा वस्तू भेट” वाटप प्रसंगी राजारामपुरी डेपो, संभाजीनगर डेपो, कावळा नाका डेपो, भाऊसिंगजी रोड डेपो आदी ठिकाणचे पदाधिकारी वृत्तपत्र विक्रेते व एजंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– “दिवाळी भेट” उपक्रम अंतर्गत मिळणारा शिधा असा
10 किलो साखर, सरकी तेल 15 लिटर, हरभरा डाळ दोन किलो, मैदा दोन किलो , खोबरे एक किलो, फुटाणे डाळ एक किलो, रवा दोन किलो, शेंगदाणे एक किलो, चिवडा पोहे दोन किलो, मोती साबण एक, सुगंधी तेल, एक चिवडा मसाला, चकली मसाला एक-एक पाकीट, पिठीसाखर एक किलो, बुंदी कळी एक किलो, अनारसा पीठ पाव किलो, पाकळी काजू पाव किलो, बेदाणे पाव किलो, दावत तांदूळ दहा किलो, हिरा बेसन एक किलो, वेलची 20 ग्रॅम, तूरडाळ दोन किलो, लिज्जत पापड, एक आणि एक लिटर गोकुळ तूप आदी किराणा वस्तू फराळासाठी दिवाळी भेट वस्तू उपक्रम अंतर्गत भिशी मधील सभासदांना दरवर्षी देण्यात येतात. यंदाचे उपक्रमाचे तेरावे वर्ष आहे. उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सभासदांनी सातत्य प्राकृत हा उपक्रम यशस्वी केला आहे.