कोल्हापुरातुन मराठा आरक्षणाची “आर-पार”ची लढाई सुरू

मशाल पेटवून सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात साखळी उपोषणाला प्रारंभ

कोल्हापूर : (लोकमानस न्यूज ४ – विशेष प्रतिनिधी) 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा लढा सुरू आहे. त्यांच्या या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून मशाल पेटवून रविवार (दि.२९ ऑक्टोबर २०२३.) पासून सकल मराठा समाजातर्फे ऐतिहासिक दसरा चौकात साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व आरक्षणाची आर-पारची लढाई करण्यासाठी कोल्हापुरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले.

या उपोषणस्थळी सकल मराठा समाजाचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सकल मराठा समाजाच्या महिला वर्गाचीही लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी, विविध समाज संघटना व पक्षाचे पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा व्यक्त केला. तसेच आरक्षणाची ही लढाई आरपारची आहे. मशाल ज्योत तेवत ठेवून आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित सकल मराठा समाजातील समाज बांधवांनी ऐक मराठा.. लाख मराठा.. आरक्षण आमच्या हक्काचं.. अशा घोषणांनी दसरा चौक परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध समाज संघटनांसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साखळी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा दिला. यावेळी सकल मराठा समाज बांधवांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

You may also like

error: Content is protected !!