सुप्रसिद्ध “यामिनी” प्रदर्शन 6 ऑक्टोबरपासून
– प्रदर्शनाच्या प्रमुख समन्वयक रेणुका सप्रे यांची माहिती
– दिवाळीनिमित्त रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा उपक्रम : यंदाचे 10 वर्ष
– सयाजी हॉटेलच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये 6 ते 8 ऑक्टोबर 2023 या काळात भरविण्यात येणार तीन दिवसीय प्रदर्शन
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे दरवर्षीप्रमाणे दिवाळीचे औचित्यसाधून यंदाच्या वर्षीही 6 ते 8 ऑक्टोबर 2023 या काळात सुप्रसिद्ध “यामिनी” या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सयाजी हॉटेलच्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते व डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नसीर बोरसदवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. अशी माहिती “यामिनी”च्या प्रमुख समन्वयक रेणुका सप्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“यामिनी” प्रदर्शनाचे यंदाचे 10 वे वर्ष –
रोटरी क्लब ऑफ गार्गीचा यशस्वी उपक्रम असलेल्या “यामिनी” प्रदर्शनाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर इचलकरंजी, सांगली, सातारासह मुंबई, पुणे, गोवा, बेळगाव, दिल्ली, बनारस आदी विविध शहरातून 90 हून अधिक स्टॉल धारक सहभागी होणार आहेत. या स्टॉलमधून ड्रेस मटेरियल, साड्या, लहान मुलांची कपडे, ज्वेलरी, डेकोरेटिव्ह वस्तू, स्किन केअर प्रॉडक्ट, याचबरोबर रियल ज्वेलरी, बनारसी व चंदेरी साड्या आधी वस्तू खरेदीचा लाभ मिळणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ गार्गीजतर्फे महिला सक्षमीकरणासाठी “यामिनी” प्रदर्शनाचा यशस्वी उपक्रम राबवत आहे. नागरिकांच्या उस्फूर्त लाभलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे महिला सक्षमीकरणाचा उद्देश प्रदर्शनाच्या माध्यमातून साध्य होताना दिसत आहे. यंदाचे दहावे वर्ष असून यामध्ये विविध वस्तूंचे 90 पेक्षा अधिक टॉल उभारण्यात येणार आहे.
– स्वयंरोजगार व महिला सबलीकरण…
या प्रदर्शनातील स्टॉलमध्ये बचत गट, अंकुर व स्वयंमच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालेला नफा – निधी हॅप्पी स्कूल करिता विविध उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सवाईकल कॅन्सर वॅक्सिंग आदी विविध उपक्रमासाठी वापरला जातो.
– “यामिनी” प्रदर्शनासाठी यांनी घेतले अविरत विशेष परिश्रम….
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून यामिनी प्रदर्शन भरवण्याविषयी तयारी सुरू आहे. या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या अध्यक्षा कल्पना घाटगे, सेक्रेटरी शोभा तावडे, ट्रेझरर ममता झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली यामिनीच्या प्रमुख समन्वयक रेणुका सप्रे, आरती पवार, दीपिका कुंभोजकर, प्रीती मर्दा, प्रीती मंत्री, गिरीजा कुलकर्णी, मेघना शेळके, योगिनी कुलकर्णी आदींसमवेत सर्व क्लब मेंबर्स अविरतपणे विशेष परिश्रम घेत आहेत. हे प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहणार आहे. याचा लाभ सर्व कोल्हापूरवासियांनी घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.