“डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल”द्वारे कोल्हापुरात “ओपीडी” सुरू

“डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल”द्वारे कोल्हापुरात
“ओपीडी” सुरू

– संचालक डॉ. संजय पठारे यांची माहिती

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

पुण्यातील “डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल”द्वारे कोल्हापुरात “ओपीडी” सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती संचालक डॉ. संजय पठारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना डॉ. पठारे यांनी दिलेली माहिती अशी,

– हृदय विकार आणि फुप्फुसाच्या अतिगंभीर आजारांसाठी बाह्य रुग्ण विभाग सज्ज

हृदय विकार आणि फुफुसाच्या अतिगंभीर आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी डीपीयु प्रायव्हेट सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरी, पुणे यांचे कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटल (डॉ. साईप्रसाद), पद्मा क्लिनिक (डॉ. मन्नाडे) आणि सिद्धिविनायक नर्सिंग होम (डॉ. संजय देसाई) मध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. ऑक्सीजनवर अवलंबून किंवा अतिगंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर काही वेळा अवयव प्रत्यारोपण सुद्धा करावे लागते. त्याकरिता राज्यातील रुग्णांना हैदराबाद चेन्नईमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात. यामुळे त्यांचा वेळ व पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. या ओपीडीमध्ये पुण्यातील डीपीयू हॉस्पिटलमध्ये आता या प्रत्यारोपणाच्या सर्व सेवा सुविधा अनुभवी कुशल डॉक्टरांच्या टीम उपलब्ध असल्याने वेळ व पैशाची बचत होईल. तसेच ओपीडी कोल्हापुरात सुरू झाल्यामुळे याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे.

– वैद्यकीय सेवा व सुविधा माहिती आणि प्रसार होणे गरजेचे

फुफ्फुस संबंधित दुर्धर, बऱ्या होऊ न शकणाऱ्या कोविडमुळे लंग फ्रायबोसिस झालेल्या, अंथरुणावर खेळलेले तसेच ऑक्सिजनवर अवलंबून असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार प्रक्रिया व फुप्फुस किंवा हृदय प्रत्यारोपण सुविधा कोल्हापूर, सांगली, सातारासह इतर महाराष्ट्रातील लोकांना माहिती व्हावी आणि त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे.

– आत्तापर्यंत अवयव प्रत्यारोपणाच्या 300 हून अधिक शस्त्रक्रिया

पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये यापूर्वी अवयव प्रत्यारोपणाच्या आतापर्यंत 300 होऊन अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यात हृदय प्रत्यारोपण फुप्फुस प्रत्यारोपण हृदय फुफुस असे दुहेरी प्रत्यारोपणाचा समावेश आहे. आता हे सर्व रुग्ण ऑक्सिजनच्या आधाराशिवाय सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यातील काहीजण पुन्हा कामावर रुजूसुद्धा झाले आहेत.

या पत्रकार परिषदेला हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशीलकुमार मलानी, हृदयरोग तज्ञ डॉ. विवेक मनाडे, प्रत्यारोपण व श्वसन विकार तज्ञ डॉ. राहुल केंद्रे व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आशिष डोळस आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी डीपीयु प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओपीडी विषयी अधिक माहिती आणि भेटीसाठी 9226007502 व 9766783153 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही केले.

You may also like

error: Content is protected !!