आगमन.. “गणरायाचे” …

- "गणपती बाप्पा मोरया".. च्या गजरात उत्साहात स्वागत...

आगमन.. “गणरायाचे” …

– “गणपती बाप्पा मोरया”.. च्या गजरात उत्साहात स्वागत…

– पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जल्लोषात आगमन मिरवणुकीने गणेशोत्सवाला आनंदोत्सवात प्रारंभ

– सकाळच्या सत्रात घरगुती “गणेशमूर्ती आगमन” 

 

तर दुपारच्या सत्रात शहरातील तालीम मंडळांच्या “गणेशमूर्ती आगमन” सवाद्य मिरवणुका

– राजारामपुरी परिसरातील मंडळांच्या मिरवणुकीत
स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लेसर-लाईट इफेक्ट, नाशिक ढोल-ताशा पथक आदींचा लवाजमा

– आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या गाण्यांच्या ठेक्यावर थिरकली तरुणाई

– घरगुतीसह तालीम मंडळांमध्ये गणेश मूर्तीची विधीवत पूजा करून प्रतिष्ठापणा

कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

पारंपरिक वाद्यांच्या गजरात, जल्लोषात मिरवणुकीने मंगळवारी (दि.19) कोल्हापुरातील घरगुती व तालीम, सार्वजनिक मंडळांच्या “गणरायाचे आगमन” झाले. घरगुतीसह तालीम मंडळांमध्ये गणेश मूर्तीची धार्मिक विधीवत पूजा करून प्रतिष्ठापणा केली.

राजारामपुरी परिसरातील तालीम,  सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीत स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लेसर-लाईट इफेक्ट, नाशिक ढोल-ताशा पथक आदींचा लवाजमा होता. या आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाईला थिरकयला लावले. आजपासून खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाला आनंदोत्सवात प्रारंभ झाला. गणेशोत्सव काळात मंडळानी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आदी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

 

– “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात गणरायाचे उत्साहात स्वागत…

आगमन गणरायाचे…

अबालवृद्धांसह महिला वर्गाने “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरामध्ये गणरायाचे आपल्या घरात व तालीम मंडळांमध्ये जल्लोषात आगमन करून स्वागत केले. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये भगवे झेंडे, डोक्याला “गणपती बाप्पा मोरया”, असा मजकूर लिहिलेल्या डोक्याला बांधलेल्या भगव्या कलरमधील पट्ट्या, डोक्यावर भगवी व पांढरी टोपी, पुरुष व महिलावर्गाने पारंपारिक वेशभूषा परिधान करून गणपती आगमन मिरवणुकीत उस्फुर्त सहभाग नोंदविला होता.

– सकाळच्या सत्रात घरगुती गणरायाचे आगमन..

 

महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश, शाहूपुरी, बापट कॅम्प आदि परिसरातील कुंभार गल्ल्यांमध्ये तसेच उपनगरातही अनेक ठिकाणी गणेश मूर्ती आपल्या घरात नेण्यासाठी करण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी झाली होती.

टाळ्या वाजवत, “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात तर काहींनी पारंपारिक ढोल ताशाच्या गजरामध्ये आपल्या घरच्या गणरायाची आगमन मिरवणूक काढुन उत्साहात स्वागत केले.

– दुपारच्या सत्रात : शहरातील तालीम मंडळांच्या जल्लोषात “गणेशमूर्ती आगमन” मिरवणुका

शहरासह उपनगरातील व ग्रामीण भागातील तालीम मंडळांनी आपल्या मंडळाची गणेशमूर्ती नेण्यासाठी सर्व कुंभार गल्ल्यांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. राजारामपुरी परिसरातील मंडळांच्या मिरवणुकीत स्क्रीन, साऊंड सिस्टीम, लेसर-लाईट इफेक्ट, नाशिक ढोल-ताशा पथक आदींचा लवाजमा होता. या आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमच्या गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाईला थिरकयला लावले. लक्षवेधी व नेत्रदीपक लेसर-लाईट इफेक्टमुळे संपूर्ण राजारामपुरी परिसर झोकाळून निघाला होता. या मिरवणुका पाहण्यासाठी शहर, उपनगरासह ग्रामीण भागातील गणेशभक्त, नागरिकांनीरात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती.

– पक्ष, संघटनांतर्फे स्वागत कक्ष…

राजारामपुरीतील तालीम मंडळांच्या आगमन मिरवणुकीवेळी पक्ष संघटना यांच्यातर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. मंडळाचा किंवा तालमीचा गणपती स्वागत कक्षाजवळ आल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून स्वागत करण्यात आले.

(सर्व मोबाईल क्लीक : नंदकुमार तेली).

 

– जिल्हा पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त…

राजारामपुरी परिसरातील मंडळांनी भव्य मिरवणुका काढल्या. या मिरवणुका एका जागी थांबून न राहता संथगतीने पुढे सरकत राहावे, यासाठी पोलिसांनी वेळोवेळी आवाहन केले. पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली. त्याला प्रतिसाद देत मिरवणुका हळूहळू पुढे सरकत राहिल्याने वाहतुकीवर तसेच गर्दीवर नियंत्रण मिळवता येणे शक्य झाले. मिरवणुकी वेळी जिल्हा पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरळीत सुरू राहिल्या. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद मिरवणूक पुढे सरकवत ठेवली. यामुळे नागरिकांना सुरळीतपणे मिरवणूक फिरून पाहता आली. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!