यंदाच्या गणेशोत्सवात “ए… आबा घुमिव” च्या ठेक्यावर थिरकणार तरुणाई…!
– कोल्हापुरी बोली भाषेतील इरसाल व अस्सल शब्द असणाऱ्या गाण्याचे लॉन्चिंग होणार 7 सप्टेंबरला
– गीत लेखक व नृत्यदिग्दर्शक सचिन बारटक्के यांची माहिती
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
यंदाच्या गणेशोत्सवात “ए… आबा घुमीव” च्या ठेक्यावर तरुणाई
थिरकेल, असा विश्वास गीत लेखक व नृत्यदिग्दर्शक सचिन बारटक्के व त्यांच्या टीमने व्यक्त केला. कोल्हापुरी बोली भाषेतील इरसाल व अस्सल शब्द असणाऱ्या गाण्याचे लॉन्चिंग होणार 7 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अशी माहिती गीत लेखक व नृत्यदिग्दर्शक सचिन बारटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सचिन बारटक्के म्हणाले, मेलोडी क्रिएटर्स व कृष्णा डान्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील कलाकारांनी कोल्हापुरी बोली भाषेतील रांगडया शब्दांचा अचूक वापर करत ‘ए… आबा घुमिव : जगात भारी कोल्हापुरी’ हे गाण्याची निर्मिती केली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी हे गाणे आकर्षण ठरेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना बारटक्के यांनी, सामाजिक कार्यकर्ते प्रविण शहा आणि उद्योजक शैलेंद्र लोहार यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, कोल्हापुरी बोली भाषेत एक रांगडेपणा आहे. बोलीभाषेतील इरसाल शब्द हे एक वैशिष्ट्य ठरले आहे. यामध्ये ‘काय मर्दा, काय भावा, नाद खुळा, काटा किर्रर्र, ईषय हार्ड, खटक्यावर बोट जाग्यावर पलटी, आंबा पाडतय, भावा जिंकलस, फशीव’असे सुमारे 60 पेक्षा अधिक शब्द रोजच्या संभाषणात वापरतात. कोल्हापुरी बोली भाषेतील शब्दांचा वापर करुन बारटक्के यांनी ‘ए … आबा घुमिव : जगात भारी कोल्हापुरी’ या नावांनी गीतलेखन केले. पार्थ कोठावळे यांनी हे गीत गायिले तर शुभम साळुंखे यांनी संगीतबद्ध केले. या गीताचे चित्रीकरण व संकलन कॅमेरामन किरण जेजुरकर यांनी केले आहे. कोल्हापुरातील विविध लोकशन्सवर हे गाणे चित्रीत केले आहे. कोल्हापुरात 7 सप्टेंबरला दहीहंडीदिवशी या गाण्याचे लाँन्चिंग करण्यात येणार आहे.
यानंतर वाडी रत्नागिरी येथील अरुण शिंगे म्हणाले, ‘ए … आबा घुमिव या गाण्यामध्ये कोल्हापुरातील कल्पक अशा कलाकरांकडून वेगळया कलाकृतीची निर्मिती झाली आहे. हे गाणे निश्चितच प्रेक्षकांना आवडेल. पत्रकार परिषदेला कृष्णा डान्स ग्रुपचे संस्थापक संतोष औंधकर उपस्थित होते.