प्रेस फोटोग्राफर्स “अवती-भवती” प्रदर्शनातून लक्षवेधी छायाचित्रे “फोटोबद्ध”….!
– “अवती-भवती” छायाचित्र प्रदर्शनाला प्रारंभ : प्रदर्शन सुरू राहणार 26 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत
– उपक्रमाचे कौतुक : नागरिकांनी अभिप्राय नोंदवून केल्या भावना व्यक्त
– कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिन साजरा
– श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील तथा राजा उपळेकर यांचा “जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव” पुरस्काराने सन्मान
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
प्रेस फोटोग्राफर्स “अवती-भवती” प्रदर्शनातून लक्षवेधी छायाचित्रे “फोटोबद्ध”….! निमित्त होते. कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित सोहळा, विविध उपक्रम व छायाचित्र प्रदर्शनाचे.
( संग्रहित फोटो)
ज्येष्ठ फोटोग्राफर प्रदर्शनातील छायाचित्राचे निरीक्षण करताना एक क्षण. ( मोबाईल क्लिक : नंदकुमार तेली).
– नागरिकांनी अभिप्राय नोंदवून केल्या भावना व्यक्त…
“अवती-भवती” छायाचित्र प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रदर्शन पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच प्रदर्शन पाहिल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त अभिप्राय नोंदवून उपक्रम व छायाचित्रे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
– “जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित
ज्येष्ठ छायाचित्रकार सुनील तथा राजा उपळेकर यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते “जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्राद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
– छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू राहणार 26 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत…
शनिवार दि. 19 रोजी येथील शाहू स्मारक भवनमध्ये हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. छायाचित्रांचे प्रदर्शन शनिवार दि. 26 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले राहील.
छायाचित्राला भाषा नसते….! : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजात घडणाऱ्या सत्य घटना जनतेसमोर मांडतात. छायाचित्राला कोणताही भाषा नसते. समाजाची छाया जनतेसमोर आणण्याची काम वृत्तपत्र छायाचित्रकार करतात, असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले. कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित “जॉनी ट्रेनर जीवनगौरव” पुरस्कार व “अवती-भवती” छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभवेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, छायाचित्रकार एका क्षणाच्या फोटोसाठी धडपडत असतो. हा क्षण टिपण्यासाठी सुखदुःख बाजूला ठेवून तो कमा करत असतो. लोकशाहीच्या चौथा स्तंभाचा छायाचित्रकार हा कणा आणि समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. जात , भाषा, धर्म याच्या पलीकडे जाऊन एकच ध्येय समोर ठेवून छायाचित्रकारांचे काम सुरू असते. “अवती-भवती” छायाचित्र प्रदर्शनातील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपलेले क्षण इतिहासात नोंद होतील. हे प्रदर्शन युवा फोटोग्राफर्ससाठी मार्गदर्शक ठरेल. प्रेस फोटोग्राफरांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन त्यांनी दिले.
– छायाचित्रकारांच्या अडचणी सोडण्यासाठी पुढाकार घेऊ : आमदार सतेज उर्फ बंटी पाटील.
वृत्तपत्रातील छायाचित्राच्या प्रदर्शनामुळे चालू घडामोडीच्या एकत्रित मेजवानी मिळाली. आलेल्या परिस्थितीचा विचार न करता निव्वळ क्षण टिपण्यासाठी वृत्तपत्र छायाचित्रकारांची धडपड सुरू असते. इतिहास जिवंत ठेवण्याचे काम फोटोग्राफरनी केलेले आहे. इतिहासामध्ये नोंद होणाऱ्या घटना कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी टिपल्या आहेत. दरवर्षी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे यामुळे समाजाला सत्य घटना कळतात. छायाचित्रकारांच्या अडचणी सोडण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
– कार्यक्रमासाठी यांचे लाभले विशेष सहकार्य…
कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलेल्या व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, कॅडसन कलर लॅबचे शशिकांत कदम, भारत कलरचे नंदकुमार मोरे व परिवार, श्री महालक्ष्मी अन्नछत्र चे अध्यक्ष राजू मेवेकरी, ऋषभ डेव्हलपर्सचे जयेश ओसवाल, महाराष्ट्र राज्य विद्युत नियंत्रण समितीचे माजी अध्यक्ष अमर समर्थ, चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
– दरवर्षी दहा हजाराची रक्कम “जीवनगौरव निधी”ची ग्वाही…
ज्येष्ठ दिवंगत छायाचित्रकार जॉनी ट्रेनर यांच्या परिवारातर्फे जस्मिन मन्सूर अत्तार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारासाठी रोख रक्कम पाच हजार रुपये दिली. तसेच उद्योजक जयेश ओसवाल यांनी या पुरस्कारासाठी दरवर्षी दहा हजाराची रक्कम “जीवनगौरव निधी” म्हणून दिली जाईल, अशी ग्वाही दिली. मानपत्राचे वाचन बी. डी. चेचर यांनी केले.
– “फोटोकॉपी” विषयक मार्गदर्शन…
दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्रॉडक्ट अँड इंडस्ट्रियल छायाचित्रकार संजय चौगुले, वेडिंग छायाचित्रकार ऋषिकेश भांबुरे, सिनेमॅटिक छायाचित्रकार शुभम चेचर यांनी युवा छायाचित्रकारांना “फोटोकॉपी” क्षेत्रातील माहिती विषयक मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन व मान्यवरांची उपस्थिती…
कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी स्वागत केले. तसेच संचालक प्रास्ताविक आदित्य वेल्हाळ यांनी, सूत्रसंचालन पत्रकार समीर देशपांडे यांनी तर राहुल गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, गोकुळचे विश्वास पाटील, बाबा जांभळे, बाबा इंदुलकर, आदींसह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, जुने ज्येष्ठ- नवे छायाचित्रकार, प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ज्येष्ठ, मुक्त पत्रकार, विविध संघटना, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.
जुन्या व जेष्ठ फोटोग्राफरच्या आठवणींना उजाळा…
( सर्व छायाचित्रे / मोबाईल क्लिक ) : – नंदकुमार तेली)