“अवती – भवती” छायाचित्र प्रदर्शन आजपासुन
– कोल्हापूर प्रेस क्लब अध्यक्ष शितल धनवडे यांची माहिती
– जागतिक छायाचित्र दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
– कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर यांचे विविध उपक्रम :
शनिवारपासुन अवती भवती छायाचित्र प्रदर्शनला प्रारंभ, चर्चासत्र, जेष्ठ प्रेस फोटोग्राफर “जॉनी ट्रेनर” स्मृती जीवनगौरव पुरस्कारचा समावेश.
कोल्हापूर (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब व कोल्हापूर फोटोग्राफर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 19 ऑगस्ट 2023 “अवती – भवती” छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असणार आहे. याचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे., अशी माहिती कोल्हापूर प्रेस क्लब अध्यक्ष शितल धनवडे व कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. यावेळी सर्व वृत्तपत्रांचे छायाचित्रकार उपस्थित होते.
ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर “जॉनी ट्रेनर” स्मृती जीवनगौरव पुरस्कार …
यावर्षीचा ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर “जॉनी ट्रेनर” स्मृती जीवनगौरव पुरस्कार सुनील तथा राजा गोपाळ उपळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर नवोदित छायाचित्रकारासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्रॉडक्ट व इंडस्ट्रियल छायाचित्रकार संजय चौगुले, वेडिंग छायाचित्रकार ऋषिकेश भांबुरे, सिनेमॅटिक छायाचित्रकार शुभम चेचर मार्गदर्शन करणार आहेत.
– “जॉनी ट्रेनर” जीवनगौरव वितरण व चर्चासत्र….
सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन, जीवनगौरव वितरण तर दुपारच्या सत्रात चर्चासत्र होणार आहेत. दिवंगत “जॉनी ट्रेनर” हे वृत्तपत्र छायाचित्र क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. दै. “पुढारी”मधून काम करताना त्यांनी सुमारे 35 वर्षे फोटोग्राफर म्हणून आपला दबदबा निर्माण केला होता. तसेच तिलारी भुकंप, लखनौ उत्तर प्रदेश, १९८९ चा महापूर यात विशेष कामगिरी केली होती. व्यावसायिक फोटोग्राफरचे ब्लॅक व्हाइट फोटो प्रिंट करून देण्यात त्यांचा हातखंडा होता.
अशा सर्व फोटोग्राफर सोबत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या जॉनी ट्रेनर यांच्या नावे “जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव”‘ या पुरस्कारराने राजा उपळळेकर (ज्येष्ठ फोटोग्राफर) सन्मानीत करण्यात येणार आहे.
तयारी अंतिम टप्प्यात….
तरी यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शितल धनवडे यांनी केले आहे.
अशी आहे प्रदर्शनाची वेळ व स्थळ : –
सकाळी १० ते रात्री ८. स्थळ : – राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर. तसेच शनिवार दि. 19 ऑगस्ट 2023. वेळ : सकाळी 11 वाजता. छायाचित्र प्रदर्शन : दि.१९ ते २५ ऑगस्ट २०२३. सकाळी १० ते रात्री ८.