मुलीत “उषाराजे” तर मुलात “महाराष्ट्र”च भारी…!
– अंतिम सामन्यात बागल हायस्कूल 2-0 गोलने तर प्रायव्हेट 4-1 गोलने पराभूत
– महानगरपालिका स्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित महानगरपालिका स्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत मुलीत “उषाराजे” तर मुलात “महाराष्ट्र”च भारी…! दोन्हीही विजयी संघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विरोधी बागल हायस्कूलवर 2 -0 व प्रायव्हेट हायस्कूल संघावर 4 – 1 गोलने विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले. तसेच दोन्हीही संघांनी विजयाची परंपराही कायम राखण्यात यश मिळविले.
शुक्रवारी दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या मुले-मुली गटातील अंतिम सामन्यांचा निकाल असा….
– 17 वर्ष मुली अंतिम सामना …
उषाराजे हायस्कूल संघाने भाई माधवराव बागल हायस्कूल संघावर 2-0 गोलने मात करुन अजिंक्यपद पटकाविले. उषाराजेकडून संस्कृती तुरुके, संयोगिता शिंदे यांनी प्रत्येकी 1 गोल करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
“उषाराजे” हायस्कूल विजयी संघ :-
प्राजक्ता लाड, रसिका साळोखे, संस्कृती तुरुके, सई धनवडे, रिचा सावंत, सुमैया देसाई, चंदना भेंडेकर, नताशा पवार, सायली देवणे, वैभवी कानडे, संयोगिता शिंदे, सई नलवडे, सई बोरनाक, अवनी उत्तुरकर, युगंधरा चौगले, आर्या कांबळे, क्रीडा शिक्षक रघु पाटील, शर्वरी दोंडकर, आर्या मोरे.
– उत्कृष्ट खेळाडू : संस्कृती तुरुके (उषाराजे हायस्कूल).
17 वर्ष मुले गट अंतिम सामना :-
महाराष्ट्र हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलवर 4-1 गोलने मोठा विजय मिळवत चषकावर कब्जा केला. महाराष्ट्र हायस्कूलकडून ईशान तिवले 2 तर अभयसिंह पाटील, रेहान मुजावर यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तर प्रायव्हेट हायस्कूलकडून रितेश पाटीलने एकमेव गोल केला.
“महाराष्ट्र” हायस्कूल विजयी संघ : –
रेहान मुजावर, पार्थ पाटील, प्रतीक गायकवाड, जाहीद शेख, गौरव माळी, सौरभ ढाले, संचित तेलंग, सहिद सय्यद, हर्ष कुलकर्णी, अथर्व पाटील, अभयसिंह पाटील, संचित साळोखे, सक्षम जगताप, ईशान तिवले, श्रेयस निकम क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, संतोष पवार, सूर्यदीप घोरपडे, शरद मेढे.
उत्कृष्ठ खेळाडू : रेहान मुजावर (महाराष्ट्र हायस्कूल).
– स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी…
सर्व विजयी, उपविजयी व उत्कृष्ट खेळाडू यांना राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत घारगे यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र घारगे यांचेमार्फत आकर्षक ट्रॉफी देण्यात आली.
– बक्षीस समारंभ मान्यवर …
स्पर्धेचा बक्षीस समारंभप्रसंगी के जी पाटील, चेअरमन प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक उषा सरदेसाई, विजय माळी, फुटबॉल खेळाडू पोलीस प्रशासन राजेंद्र घारगे, अबू शेख, राजू जरळी, प्राथमिक शिक्षण समिती कनिष्ठ लिपिक अविनाश लाड, संजय शिंदे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सॉकर रेफ्री असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. बक्षीस समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांनी केले, मान्यवरांचे आभार सुरेश चव्हाण यांनी मानले.
– यांनी केले स्पर्धेचे नियोजन
संपूर्ण स्पर्धेचे नियोजन क्रीडा आधिकारी अरुण पाटील, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, सुरेश चव्हाण यांनी केले.