मुली फुटबॉल स्पर्धेतील सामान्यांचा बिगुल आज
– सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा
– 17 वर्षे मुली गटातील सहा संघाचा सहभाग
– 17 वर्षे मुले गटातील उपांत्यपूर्व व उपांत्य फुटबॉल सामन्यांचा थरारही आजच
(संग्रहीत फोटो).
कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित महानगरपालिकास्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेअंतर्गत 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांचा बिगुल आज गुरुवार दि. 3 ऑगस्ट 2023 रोजी वाजणार आहे. मुलींच्या होणाऱ्या सामन्यांमध्ये सहा संघांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच आजच 17 वर्षे मुले गटातील उपांत्यपूर्व व उपांत्य सामन्यांचा थरार मैदानावर पहावयास मिळणार आहे. अशी माहिती मनपा क्रीडा विभागाकडून देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित महानगरपालिका स्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेअंतर्गत बुधवारी (दि 02.08.2023) झालेल्या 14 सामान्यांचा सविस्तर निकाल असा …..
1.) पोद्दार स्कूल विजयविरुद्ध राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल 2-0 पोदार कडून हसनेन अन्सारी रौनक बागडी प्रत्येकी एक गोल.
2.) शाहू दयानंद हायस्कूल विजयविरुद्ध नेहरू हायस्कूल 1-0 शाहू दयानंद कडून केदार माळी 1 गोल.
3.) हनुमंतराव चाटे स्कूल विजयविरुद्ध शिवाजी मराठा हायस्कूल 1-0 चाटेकडून वेदांत पाटील 1 गोल.
4.) छ. शाहू विद्यालय विजयविरुद्ध माईसाहेब बावडेकर अकॅडमी 2-0 शाहू विद्यालय कडून आरुष पाटील 2 गोल.
5.) पोद्दार स्कूल विजयविरुद्ध महावीर इंग्लिश मीडियम स्कूल 1-0 पोद्दार कडून रोनक मिस्त्री 1 गोल.
6.) शाहू दयानंद हायस्कूल विजय विरुद्ध कोल्हापूर इंग्लिश स्कूल 1-0 शाहू दयानंद कडून अळोबा कात्रट 1 गोल.
7.) महाराष्ट्र हायस्कूल विजय विरुद्ध शांतीनिकेतन स्कूल 3-1 महाराष्ट्र कडून रेहान मुजावर 2 साहिल सय्यद एक गोल तर शांतिनिकेतन कडून साई नागेशकर 1 गोल.
8.) जय भारत हायस्कूल विजयविरुद्ध रा छ शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार 0-0 जय भारत हायस्कूल सडन देथ वर विजय.
9.) प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयविरुद्ध प्रबुद्ध भारत हायस्कूल 2-0 प्रायव्हेट इंग्लिश स्कूल कडून साईराज पाटील विश्वराज पाटील प्रत्येकी 1 गोल.
10.) विद्यापीठ हायस्कूल विजयविरुद्ध शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल 0-0 विद्यापीठ हायस्कूल 3-1 ने ट्राय ब्रेकर वर विजय.
11.) सेंट झेवियर्स हायस्कूल विजयविरुद्ध न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगर 2-0 सेंट झेवियर्स हायस्कूल कडून ऑलिव्ह फर्नांडिस व श्रेणिक शिंदे 1 गोल.
12.) प्रायव्हेट हायस्कूल विजयविरुद्ध न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर 0-0 प्रायव्हेट हायस्कूल 3-2 ट्रायब्रेकर वर विजय.
13.) पोद्दार स्कूल विजयविरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय 0-0 पदर स्कूल 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय.
14.) शाहू दयानंद हायस्कूल विजयविरुद्ध हनुमंतराव चाटे स्कूल 1-1 शाहू दयानंद कडून बाळासाहेब कदम तर हनुमंतराव चाटे कडून आहील पटेल 1 गोल शाहू दयानंद हायस्कूल 3-2 ने ट्राय ब्रेकर वर विजय.