“सुब्रोतो” चषकावर “महाराष्ट्र”चा कब्जा

- 14 वर्षाखालील (मुले गट) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर 3-0 गोलने मात

 “सुब्रोतो” चषकावर “महाराष्ट्र”चा कब्जा
– 14 वर्षाखालील (मुले गट) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात छत्रपती शाहू विद्यालय एसएससीवर 3-0 गोलने मात

– विजयी परंपरा कायम राखण्यात यश

– उत्कृष्ट खेळाडू सम्राट मोरबाळे (महाराष्ट्र हायस्कूल)

 

कोल्हापूर : (मानस न्युज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित महानगरपालिका स्तरीय 14 वर्षाखालील (मुले गट) सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघावर 3 – 0 गोलने एकतर्फी विजय मिळवत चषकावर
“कब्जा” केला.

महाराष्ट्र हायस्कूलने सुरवातीपासूनच वेगवान खेळ करून सामन्यावर वर्चस्व राखले. महाराष्ट्र हायस्कूल संघाकडून खेळताना सम्राट मोरबाळे, हर्षवर्धन पाटील, ऋषिकेश हराळे यांनी प्रत्येकी 1 गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघाचे खेळाडू पूर्णवेळ सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्र हायस्कूल संघाने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघावर 3-0 गोलने एकतर्फी विजय मिळवत चषक पटकावले.

                                                 (फोटॊ : संग्रहित).

 

– विजयीची परंपरा राखली
कायम ….

छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर सुरू असलेल्या सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि. 31 जुलै 2023) झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूल संघाने छत्रपती शाहू विद्यालय एसएससी संघावर 3-0 गोलने एकतर्फी मात करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब करून विजयीची परंपरा कायम राखली. महाराष्ट्र हायस्कूल संघाने यापूर्वी चषकावर निर्विवाद 11 वेळा आपले नाव कोरले आहे. यंदाचे विजेतेपद हे 12 ठरले.

– महाराष्ट्र हायस्कूल विजयी संघ….

कर्णधार सर्वेश गवळी, गोल किपर श्लोक माळी, साईराज पाटील, सम्राट मोरबाळे, अजय वडर, अर्णव शिंदे, ध्रुवराज साळोखे, हर्ष पाटील, संकेत जाधव, ऋषिकेश हराळे, साईराज सुतार, राजवीर खराडे, पृथ्वेश बागडेकर, प्रतीक इंगवले, पृथ्वीराज साळोखे, संचित उपलानी क्रीडा शिक्षक : प्रदीप साळोखे, व्ही एस पाटील मार्गदर्शक : संतोष पवार, सूर्याजीत घोरपडे, शरद मेढे.

उत्कृष्ट खेळाडू

सम्राट मोरबाळे (महाराष्ट्र हायस्कूल).

 

– राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू
स्मरणार्थ चषक

सदर स्पर्धेला राष्ट्रीय शालेय फुटबॉल खेळाडू अवधूत राजेंद्र घारगे यांचे स्मरणार्थ राजेंद्र घारगे यांचे कडून विजेता, उपविजेता व उत्कृष्ट खेळाडू यांना आकर्षक चषक देण्यात आला.

– बक्षीस समारंभ व मान्यवर उपस्थित

शंकर केशव यादव प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर महानगरपालिका, एस एस पाटील मुख्याध्यापक महाराष्ट्र हायस्कूल, एस एस मोरे उपमुख्याध्यापक महाराष्ट्र हायस्कूल, बाळासाहेब कांबळे शैक्षणिक पर्यवेक्षक प्राथमिक शिक्षण समिती, विश्वास चोपडे जिमखाना प्रमुख महाराष्ट्र हायस्कूल यांच्या हस्ते व क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सॉकर रेफ्री असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक सुरेश चव्हाण, फुटबॉल रेफ्री राहुल तिवले उपस्थितीत होते.

– स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून यांनी पाहिले काम….

हर्षल राऊत, गजानन मनगुतकर, अवधूत गायकवाड, गौरव माने, शहाजी शिंदे, अभिजीत गायकवाड, निरंजन कामते, ऋषिकेश दाभोळे, रोहित मंडलिक, सिद्धी शेळके.

         —————————————-

दरम्यान, 17 वर्षे मुले सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 31 जुलै 2023) झालेल्या 10 सामन्यांचा सविस्तर निकाल असा….

1.) आर्यव्रिन ख्रिश्चन हायस्कूल विजयविरुद्ध चाटे स्कूल माध्यमिक 3-0 आर्यव्रिन ख्रिश्चन कडून शेहजादा खान 2 तर सैफुला पटवेगार 1 गोल.

2.) शांतिनिकेतन स्कूल विजयविरुद्ध न्यू हायस्कूल 1-0 शांतिनिकेतन कडून राजवीर मोहिते 1 गोल.

3.) महाराष्ट्र हायस्कूल विजयविरुद्ध दादासाहेब मगदूम हायस्कूल 4-0 महाराष्ट्र हायस्कूल कडून प्रतिक गायकवाड, गौरव माळी, सय्यद सईद, हर्ष कुलकर्णी प्रत्येकी एक गोल.

4.) छत्रपती शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार विजयविरुद्ध सेवेन्थ डे स्कूल 2-0 शाहू महाराज हायस्कूल कडून दर्शन पिसाळ, रोहन बिरांडी प्रत्येकी 1 गोल.

5.) जयभारत हायस्कूल विजयविरुद्ध आर्यव्रिन ख्रिश्चन हायस्कूल 0-0 जयभारत हायस्कूल 3-1 ने ट्रायब्रेकर वर विजय.

6.) शांतिनिकेतन स्कूल विजयविरुद्ध छ. शाहू विद्यालय सीबीएसई 1-1 शांतीनिकेतन कडून राजवीर मोहिते तर शाहू विद्यालय कडून पृथ्वीराज चौगुले 1 गोल शांतिनिकेतन स्कूल 3-0 ट्रायब्रेकर वर विजय.

7.) वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल विजयविरुद्ध देशभूषण हायस्कूल 0-0 वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल 1-0 ट्रायब्रेकर वर विजय.

8.) सौ शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल विजयविरुद्ध शिवशक्ती हायस्कूल 0-0 शीलादेवी शिंदे हायस्कूल 4-2 ने ट्रायब्रेकर वर विजय.

9.) प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयविरुद्ध नागोजीराव पाटणकर हायस्कूल 0-0 प्रायव्हेट इंग्लिश स्कूल 2-1 ने ट्रायब्रेकरवर विजय. 10.) भाई माधवराव बागल हायस्कूल विजयविरुद्ध एस्टर पॅटर्न हायस्कूल 0-0 भाई माधवराव बागल हायस्कूल 2-1 ने ट्रायब्रेकरवर विजय.

——––——————————-
कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आयोजित महानगरपालिका स्तरीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा : छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे मंगळवारी (दि 1.08.2023) झालेल्या 17 वर्ष मुले गटातील 14 सामन्यांचा सविस्तर निकाल असा….

1.) विद्यापीठ हायस्कूल विजयविरुद्ध वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल 1-0 विद्यापीठ कडून चैतन्य जामदार 1 गोल.

2.) शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल विजयी विरुद्ध स म लोहिया हायस्कूल 0-0 शिलादेवी डी शिंदे सरकार हायस्कूल 2-1 ने ट्रायब्रेकर वर विजय.

3.) न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, जरगनगर विजयविरुद्ध श्रीपतराव बोंद्रे स्कूल न्यू इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर कडून अवधूत मोडक 2 गोल.

4.) प्रायव्हेट हायस्कूल विजयविरुद्ध न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल 0-0 प्रायव्हेट हायस्कूल 2-1 ट्रायब्रेकर वर विजय.

5.) व.झ. देशमुख इंग्लिश स्कूल विजय विरुद्ध माईसाहेब बावडेकर माध्यमिक स्कूल 0-0 व . ज. देशमुख इंग्लिश स्कूल 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय.

6.) राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल विजय विरुद्ध भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल 0-0 राधाबाई शिंदे ग्लोबल 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय.

7.) प्रायव्हेट इंग्लिश स्कूल विजयविरुद्ध श्री साई हायस्कूल 1-0 प्रायव्हेट इंग्लिश स्कूल कडून रेहान संकेश्वर 1 गोल.

8.) प्रबुद्ध भारत हायस्कूल विजयविरुद्ध भाई माधवराव बागल हायस्कूल 0-0 प्रबुद्ध भारत हायस्कूल 4-3 ने ट्रायब्रेकर वर विजय.

9.) न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर विजयविरुद्ध प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल 1-0 न्यू इंग्लिश कडून विजय कातारी 1 गोल.

10.) प्रायव्हेट हायस्कूल विजयविरुद्ध साई इंग्लिश मीडियम स्कूल जरगनगर 1-0 प्रायव्हेट हायस्कूल कडून प्रणव पवार 1 गोल.

11.) न्यू इंग्लिश मीडियम स्कूल संभाजीनगर विजयविरुद्ध व.ज. देशमुख इंग्लिश स्कूल 2-0 न्यू इंग्लिश मीडियम कडून समरजीत रावराणे, पियुष पवार 1 गोल.

12. सेंट झेवियर्स हायस्कूल विजयविरुद्ध राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल 3-1 सेंट झेवियर्स कडून अद्वैत पाटील पृथ्वीराज साळुंखे श्रेणिक शिंदे 1 गोल तर राधाबाई शिंदे ग्लोबल कडून वर्धन जगदाळे 1 गोल.

13.) माईसाहेब बावडेकर अकॅडमी विजयविरुद्ध संजीवन स्कूल कदमवाडी 2-0 माय साहेब बावडेकर अकॅडमी कडून अक्षद भोसले 2 गोल.

14.) हनुमंतराव चाटे स्कूल विजयविरुद्ध विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल 0-0 हनुमंतराव चाटे 3-2 ने ट्रायब्रेकर वर विजय.

You may also like

error: Content is protected !!