“वडार पँथर संघटने”च्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नलवडे
– राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंद (भाऊ) इरकल यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी – नंदकुमार तेली)
“वडार पँथर संघटने”च्या कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश नलवडे यांची निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
वडार समाज्याच्या न्याय व हक्कासाठी तसेच त्यांच्या हितासाठी लढणारी “वडार पँथर संघटना आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्य”चे संस्थापक अध्यक्ष दयानंद (भाऊ) इरकल आहेत. तसेच ते राष्ट्रवादी पार्टी, पुणे शहर उपाध्यक्षही आहेत. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, समाजाच्या हितासाठी कार्यें करणारे, महाराष्ट मधील सर्व जिल्ह्यातील विविध पदांसाठी पदाधिकऱ्यांची निवड करण्यात आली.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेश (भाऊ) नलवडे यांचा वडार समाजासाठी करत आलेल्या कार्यांचा तसेच त्यांच्या विचारांचा आणि जिल्ह्यातील त्यांचा संपर्काचा आढावा, घेऊन त्यांना वडार पँथर संघटनेचे “कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख” म्हणून या पदासाठी निवड करण्यात आली असल्याचेही यावेळी अध्यक्ष दयानंद (भाऊ) इरकल यांनी सांगितले.