दूध संकलन वाढ महत्त्वाचा मुद्दा

-- "गोकुळ"चे नूतन चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांचे प्रतिपादन

फोटो ओळ : – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ कोल्हापूर (गोकुळ) च्या संचालक मंडळाच्या सभेत नूतन अध्यक्षपदी अरुणकुमार डोंगळे यांची निवड करण्यात आली. संचालक सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे डॉ. महेश कदम होते. यावेळी उपस्थित संचालक मंडळातील सदस्य.

दूध संकलन वाढ महत्त्वाचा मुद्दा

– “गोकुळ”चे नूतन चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांचे प्रतिपादन

– दुग्ध व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार

– गोकुळच्या नूतन चेअरमनपदी अरुणकुमार डोंगळे यांची निवड

– उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संकल्प

– निवडीनंतर कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण व जयघोष करत एकच जल्लोष : साऊंड सिस्टिमवर थिरकले समर्थक

कोल्हापूर : ( “मानस न्युज 9” : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

मार्केटिंगसह क्वालिटीला महत्त्व आहे. तसेच विक्री पेक्षा दूध संकलन वाढ महत्त्वाचा मुद्दा आहे. यासाठी दुग्ध व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे., असे प्रतिपादन गोकुळचे नूतन चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) च्या चेअरमनपदी अरुणकुमार गणपतराव डोंगळे ( घोटवडे, ता. राधानगरी) यांची गुरुवारी (२५ मे २०२३) झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे डॉ. महेश कदम होते. निवडीनंतर झालेल्या गोकुळचे नूतन चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

– गोकुळचे दूध संकलन 20 लाख लिटर करणार

यावेळी बोलताना चेअरमन डोंगळे म्हणाले, गोकुळचे दूध संकलन 20 लाख लिटर करणे दूध उत्पादकांना दरवाढ देणे आदी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संकल्प केला आहे. यामध्ये कृत्रिम रेतन कामकाज पशुवैद्यकीय दैनंदिन रूट सेवेप्रमाणे, भ्रूण प्रत्यार्पण कार्यक्रम, विंध्यत्व निवारण कार्यक्रम, आयुर्वेद औषधी निर्मिती कारखाना उभारणार, मस्टायटीस प्रतिबंधात्मक व्हॅक्सीन उपलब्ध करून देणे, गडमुडशिंगी येथे अध्यायावत प्रयोगशाळा उभारणे, गडमुडशिंगी पशुखाद्य कारखाना नूतनीकरण व विस्तारीकरण तसेच दुग्ध व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न आदींचा समावेश आहे.

– गुलालाची उधळण…

चेअरमनपदी अरुणकुमार डोंगळे यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व जयघोष करत एकच जल्लोष केला. तसेच साऊंड सिस्टिमवर समर्थक थिरकले.

– अध्यक्षपद रोटेशन पद्धतीने

गोकुळमधील सत्तांतरानंतर अध्यक्षपद रोटेशन पद्धतीने देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला होता. पहिल्या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर नवीन अध्यक्ष म्हणून अरुणकुमार डोंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

– विरोधी संचालक अनुपस्थित

या बैठकीवेळी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. विरोधी संचालक अनुपस्थित असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होती.

You may also like

error: Content is protected !!