“कोल्हापूर हायस्कूल”चा माजी विद्यार्थी मेळावा “रविवारी”
– मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ यांची माहिती
– शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटी संचलित कोल्हापूर हायस्कूलचे यंदाचे “अमृत महोत्सवीवर्ष”. याचे औचित्य साधून रविवार दि. 23 एप्रिल 2023 रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत दिवसभर विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे., अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक विवेकानंद हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
“अमृतमहोत्सवी सोहळा” – माजी विद्यार्थी मेळावा
कोल्हापूर हायस्कूलची स्थापना 15 जून 1947 रोजी झाली. शाळेचे यंदाचे 75 वे वर्ष आहे. शाळेच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले सर्व माजी विद्यार्थी “अमृतमहोत्सवी सोहळ्याचे” औचित्य साधून एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्ताने आपल्या शाळेबद्दल चा ऋणानुबंध वृद्धिगंध करण्याची संधी माझी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच आपल्या शाळेतील जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटून आठवणींना उजाळा देता येणे शक्य होणार आहे. तसेच सध्या शिक्षण घेत असलेल्या आजी विद्यार्थ्यांना शाळेची शैक्षणिक गुणवत्ता व खेळातील प्राविण्य, माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, अनुभव ऐकून प्रेरणा मिळणार आहे. तरी जास्तीत – जास्त माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावावी, असे आवाहन संयोजक माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
– दिवसभरातील विविध कार्यक्रमाचे नियोजन असे….
रविवारी सकाळी 8 ते 9 या वेळेत माजी विद्यार्थी नोंदणी, 9 ते 10 या वेळेत पारंपरिक पद्धतीने जनजागृती व प्रबोधनपर संदेश देणाऱ्या चित्ररथासह सवाद्य प्रभात फेरी (कोल्हापूर हायस्कूल, मिरजकर तिकटी, पाण्याचा खजिना, फिरंगाई मंदिर , गांधी मैदान, पुन्हा परत कोल्हापुर हायस्कूल येथे आल्यानंतर प्रभात फेरीची सांगता.) 10 ते 12.30 या वेळेत मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन (प्रतिमापूजन, दीप प्रज्वलन, स्वागत व प्रस्ताविक, सत्कार, माजी विद्यार्थी मनोगत, माजी मुख्याध्यापक मनोगत, विद्यमान मुख्याध्यापक मनोगत व अहवाल वाचन, प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन.)., 12.30 ते 2.30 या वेळेत स्नेहभोजनाचा कार्यक्रम, 2.30 ते 3.30 या वेळेत माजी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचा सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी, 3 ते 4 माजी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराच्या सादरीकरणाचा सांस्कृतिक कार्यक्रम, 4 ते 5 आभार प्रदर्शन, सर्वात शेवटी वंदे मातरम झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
– अमृतमहोत्सवी सोहळ्याला लाभणार यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे पुणे शिक्षक मतदार संघ आमदार जयंत असगावकर, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे एम जी वालीखिंडी, प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर रामाने, संस्थेचे सचिव श्रीकांत बनछोडे, खजानिस रंगराव जाऊंदाळ, कोजिमाशी पतसंस्था तज्ञ संचालक दादासाहेब लाड, जिमखाना प्रमुख जी. बी. पाटील, माजी विद्यार्थी अध्यक्ष श्रीकांत मनोळे आदींसह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.