“शिवाजी विरुद्ध पीटीएम” हाय होल्टेज सामना रंगणार “आज”

- संघ समर्थक, फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला

  1. “शिवाजी विरुद्ध पीटीएम” हाय होल्टेज सामना रंगणार “आज”

– छत्रपती शाहू स्टेडियमच्या फुटबॉल मैदानावर पारंपारिक प्रतिस्पर्धी दोन पेठांमधील प्रमुख संघात होणार चित्तथरारक लढत

– संघ समर्थक, फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला

– श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव चषक फुटबॉल स्पर्धा : दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी अंतिम लढत.

– दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा विजयासाठी सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत झुंजणार

– समर्थकांच्या   “नाद खुळा” व “एक झेंडा फिरवा” च्या  जयघोषाने घुमणार स्टेडियम परिसर

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापुरातील पेठांमधील पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले प्रमुख दोन संघ शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात चित्तथरारक लढत होणार आहे. अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार होणारा हा सामना पाहण्यासाठी संघ समर्थक, फुटबॉलप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

छत्रपती शाहू स्टेडियमच्या फुटबॉल मैदानावर श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेतील अंतिम “हाय होल्टेज सामना” पारंपरिक प्रतिस्पर्धी “शिवाजी विरुद्ध पीटीएम” यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामात प्रथमच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे हा सामना पाहण्यासाठी अबालवृद्ध फुटबॉल प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. यामुळे शनिवारी (15 एप्रिल 2023) दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी होणारा हा चुरशीचा सामना पाहण्यासाठी दोन्ही पेठांमधील संघ समर्थक व फुटबॉलप्रेमींची उच्चांकी गर्दी करणार यात शंका नाही. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “नाद खुळा” व “एक झेंडा फिरवा” च्या जयघोषाने स्टेडियमच्या गॅलरीमध्ये समर्थकांचा आवाज घुमणार आहे. सामन्यातील विजय महत्त्वाचा असल्याने हाय व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघातील मैदानावरील रणनीती, प्लेइंग खेळाडूंमध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यतेची चर्चा समर्थक व फुटबॉलप्रेमींमध्ये आहे.

सोशल मीडियावरवरून दोन पेठांमधील फुटबॉल खेळाची इर्षा

संघ समर्थक, फुटबॉलप्रेमींकडून सोशल मीडियावर आप-आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीचे व आपलाच संघ कसा अव्वल याबाबतचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत. (नाद खुळा … एकच झेंडा फिरवा…आदी.) यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी दिवसभर दोन्ही संघातील समर्थक व फुटबॉलप्रेमींमध्ये सोशल मीडियावरवरून पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ व दोन पेठांमधील फुटबॉल खेळाची इर्षा पहावयास मिळाली.

– मैदानावरील लढत पाहण्यासाठी समर्थक फुटबॉलप्रेमींची होणार गर्दी

हा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहता यावा यासाठी सकाळपासूनच तिकीट बुकिंगसाठी काउंटरवर दोन्ही संघांचे समर्थक व फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली आहे. यामुळे अखेरच्या मिनिटापर्यंत रंगतदार होणारा हा पारंपरिक प्रतिस्पर्धीमधील सामना पाहण्यासाठी उच्चांकी गर्दी होणार आहे.

संग्रहित फोटो 

 

शिवाजी तरुण मंडळ

करण चव्हाण-बंदरे, रोहित यादव, शरद मेढे, मयूर चौगुले, संकेत साळुंखे, विक्रम शिंदे, सुयश हांडे, साहिल निंबाळकर, शुभम साळुंखे, विशाल पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, सुमित जाधव, सिद्धेश साळुंखे, जय कामत, संदेश कासार, योगेश कदम, रोहन आडनाइक, इंद्रजीत चौगुले, आदित्य लायकर. ( केएसएमध्ये संघाकडून नोंदणी केलेले एकूण 19 खेळाडू).

पाटाकडील तालीम मंडळ (अ)

अक्षय पायमल, प्रतीक बदामे, ऋषिकेश मेथे – पाटील, अक्षय मेथे – पाटील, प्रथमेश हेरेकर, रोहित देसाई, ओंकार पाटील, ऋषभ ढेरे, ओंकार मोरे, शाहिद महालकारी, विक्टर जॅक्सन, राजीव मरियाला, सोमीदे, यश देवणे, यश यरंडोली, सैफ हकीम, रोहित पोवार, रणजीत विचारे, ओमकार जाधव, कैलास पाटील, आदित्य कालोली, प्रेम देसाई.
( केएसएमध्ये संघाकडून नोंदणी केलेले एकूण – 22 खेळाडू.).
– (11 प्लेइंग, 9 बदली व 2 नॉन प्लेइंग खेळाडू).

पारंपारिक प्रतिस्पर्धी चालू फुटबॉल हंगामात प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले….!

चंद्रकांत जाधव चषक ही स्पर्धा चालू हंगामातील चौथी स्पर्धा सुरू आहे. हंगामाला सुरुवात केएसए फुटबॉल लीग पासून होते. या लीग स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने अव्वल स्थान पटकावले. यानंतर झालेल्या पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक या दुसऱ्या फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळला नमवत दिलबहारने चषकावर कब्जा केला. सलग दोन चषक पटकावून दिलबहारने हंगामाची दमदार सुरुवात केली. त्यांच्या या विजयी घोडदौड रोखण्यात खंडोबा तालीम मंडळला यश मिळाले. कोल्हापूर महानगरपालिका चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबाने बालगोपाल तालमीवर मात करून चषक पटकावला. तर संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित राजेश क्षीरसागर फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने डार्क हॉर्स ठरलेल्या झुंजार क्लबवर मात करून सलग दुसरे चषक पटकावत आपले वर्चस्व कायम ठेवले. बालगोपाल संघाला दोन वेळा व झुंजार क्लबला एक वेळा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले.मात्र, केएसए लीगनंतर झालेल्या चौथ्या श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित स्वर्गीय चंद्रकांत जाधव चषक फुटबॉल स्पर्धेत या दोन्हीही संघांना अंतिम फेरी गाठता आली नाही. हंगामात दिग्गज ठरलेल्या संघा व्यतिरिक्त या स्पर्धेतील अंतिम लढतीसाठी दोन पेठातील प्रमुख संघ व पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ चालू फुटबॉल हंगामात प्रथमच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा विजयासाठी सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत झुंजणार आहेत.

You may also like

error: Content is protected !!