“मोफत समुपदेशन व आरोग्य तपासणी शिबिर” 2 एप्रिला
– संयोजक अमन फाउंडेशन कोल्हापूर संचलित, केअर (Center of Autism Resourceful Education) यांची माहिती
– जागतिक स्वमग्नता दिन 2023 (2 एप्रिल 2023 –
World Autism Day) निमित्त (स्वमग्न ,गतिमंद मुले व पालक यांचे करिता) आयोजन
कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
अमन फाउंडेशन कोल्हापूर संचलित, केअर (Center of Autism Resourceful Education) मार्फत जागतिक स्वमग्नता दिन 2023 (2 एप्रिल 2023 -World Autism Day) निमित्त (स्वमग्न ,गतिमंद मुले व पालक यांचे करिता) “मोफत समुपदेशन व आरोग्य तपासणी शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक अमन फाउंडेशन कोल्हापूर संचलित, केअर (Center of Autism Resourceful Education) यांच्या वतीने देण्यात आली आहे.
– विधायक उद्देशाने उपक्रमाचे आयोजन
विशेष मुलांना असणाऱ्या समस्यांमुळे दातांच्या आरोग्याची काळजी घेणे हे पालकांसाठी कठीण ठरतं. अशा मुलांना सांभाळताना येणाऱ्या मानसिक दडपणामुळे पालकांमध्येही शारीरिक समस्या उद्भवत असतात. याच उद्देशाने अमन फाउंडेशन कोल्हापूर संचलित, केअर (Center of Autism Resourceful Education) तर्फे या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
– शिबिरात मिळणार औषधोपचारांचा लाभ
शिबिरांतर्गत तज्ञांमार्फत मुलांचे दातांचे आरोग्य, जनरल तपासणी तसेच फिजिओथेरपी, स्पीच थेरपी बाबत मार्गदर्शन करणेत येईल. याबरोबरच पालकांसाठी रक्तदाब व जनरल तपासणी व मोफत रक्त तपासण्या (हिमोग्लोबिन व इतर रक्त घटक, रक्तगट , मधुमेह, थायरॉईड) तसेच औषधोपचारांचा लाभ घेता येणार आहे.
– जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण
2 एप्रिल 23 रोजी पालक व हितचिंतकांच्या सहभागातून ऑटिझम बाबत जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण शहरात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे . भवानी मंडप, कोल्हापूर येथून सायंकाळी पाच वाजता प्रारंभ होणार आहे.या दोन्ही उपक्रमांना सर्वांनी अमन फाउंडेशन कोल्हापूर व परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
– शिबिराची वेळ व स्थळ
शिबिराची वेळ- सकाळी 11 ते दु . 1., स्थळ – केअर विकास केंद्र आरगे हॉस्पिटल मजला, युरेका डायग्नोस्टिकच्या वर, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी कोल्हापूर पूर्व नोंदणीसाठी संपर्क : – 9448571500., – 9445389494.