“एच. पी. व्ही. लसीकरण” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

- ५०० मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घेतला लसीकरणाचा लाभ

“एच. पी. व्ही. लसीकरण” ला उत्स्फूर्त प्रतिसाद

– ५०० मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घेतला लसीकरणाचा लाभ

– मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लस

– यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट, हिरकणी सी,पी,ए, असोशियन आणि गार्गी रोटरी क्लब, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये गुरुवारी (दि. 23) यशोमंगल चॅरिटेबल ट्रस्ट, हिरकणी सी,पी,ए, असोशियन आणि गार्गी रोटरी क्लब, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “एच. पी. व्ही. लसीकरण” जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कोल्हापुरातील नऊ ते वीस वर्षे वयोगटातील ५०० मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लसीकरणाचा लाभ घेतला. या अंतर्गत उपक्रमात सहभागी मुलींना गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर प्रतिबंध लस विनामूल्य देण्यात आली.

– यांच्या विशेष सहकार्यातून लस मोफत उपलब्ध

कॅन्सर पेशंट ऍड असोशियन इंडिया डॉ. धनंजया सारनाथ ( एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर, रिसर्च स्टडीज ॲडिशनल प्रोजेक्ट) तसेच भावना शर्मा, प्रिया प्रसाद यांच्या विशेष सहकार्यातून ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली होती.

– यांनी घेतले विशेष परिश्रम

कोल्हापूर मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये गुरुवारी हा लसीकरणचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.राधिका जोशी (स्त्रीरोग तज्ञ) यशोमंगल क्लिनिक कोल्हापूर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

– रॅलीद्वारे एच. पी. व्ही. लसीकरण जनजागृती

पिंक इंडिया टीम ने कोल्हापूर मध्ये पिंक कार रॅलीद्वारे एच. पी. व्ही. लसीकरण बाबत जनजागृती देखील केली होती.

– लसीकरणासाठी ५०० हून अधिक मुलींचा प्रतिसाद

कोल्हापुरात या लसीकरणासाठी ५०० हून अधिक मुलींनी लसीकरण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाभ घेतला. अशी माहिती, के. एम ए. च्या अध्यक्षा डॉ. गीता पिलाई, व हिरकणी फाउंडेशनच्या संस्थापिका जयश्री शेलार, डॉ. वैदेही टोके, गीताताई हासुरकर, वर्षा कुराडे यांच्या कडून देण्यात आली.

You may also like

error: Content is protected !!