गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज माजी विद्यार्थी : तिसरे महास्नेह संमेलन आज
– गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज माजी विद्यार्थी संघटना संयोजन समितीची माहिती
– रविवारी दुपारी दोन वाजल्या पासून मुस्कान लॉनवर मिळणार जुन्या आठवणींना उजाळा
कोल्हापूर : – (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)
जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी दुपारी दोन वाजल्या पासून मुस्कान लॉनवर भेटू. निमित्त आहे. तिसरे महास्नेह संमेलनाचे (२०२३). हे संमेलन रविवार दिनांक २६ मार्च २०२३ रोजी) आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज माजी विद्यार्थी संघटना संयोजन समितीतर्फे देण्यात आली आहे.
– या ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
त्यामध्ये कॉलेजमध्ये सुरुवातीच्या काळात विद्यार्थी असलेले आणि वयाची ६५ वर्षे ओलांडलेल्या माजी जेष्ठ मित्रांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये माजी आमदार मा. बजरंग देसाई, कॉलेजचे सेक्रेटरी मा. जय कुमार देसाई, आंतर राष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व केलेले ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा डॉ जय सामंत , साखर उद्योगातील ज्येष्ठ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केले असे मा. पी जी मेढे, सहकार व दुग्ध व्यवसायात अग्रणी असलेले मा अरुण नरके , क्रीडा क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च असा अर्जुन पुरस्कार ने सन्मानित असणाऱ्या मा.शैलजा साळोखे , मुकेश म्हणून गायनात आपली ओळख निर्माण केली असे मा. चंद्रकांत चव्हाण , दिलीप निंबाळकर , ज्येष्ठ गायिका सुचित्रा मोर्डेकर, गणेश मोरे ,दिलीप सोनुले, प्रा डॉ रूपा शहा , माजी स्थायी समिती सभापती आर डी पाटील या व याशिवाय येणाऱ्या ज्येष्ठ माजी विद्यार्थी यांचा आपणं सत्कार करणार आहोत. कार्यक्रमात कधीही भाषण असत नाही. त्यामुळे कार्यक्रमाच्या पूर्वी भेटी , गप्पा , आपले मनोगत व्यक्त करणे , चहा यासाठी वेळ ठेवला आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व भोजन आयोजित केले आहे. तरी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी दुपारी दोन वाजल्या पासून मुस्कान लॉन वर भेटूया असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
– येणार आहेत…. मान्यवर आणि आपले जीवाभावाचे मित्र मैत्रिणी…!
* या प्रसंगी शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित असणार आहेत
विशेषतः आपल्या कामातून वेळ काढून कोल्हापूर बाहेरून व कोल्हापुरातून काही मान्यवर , प्रतिथयश माजी विद्यार्थी संमेलनासाठी येत आहेत…ते.. . @रवी व्हटकर ,सचिव गृह मंत्रालय, @सचिन सावंत , पोलीस उप अधीक्षक @दिनेश घाटगे, उप सचिव , जलसंपदा मंत्रालय, @कल्पना ढवळे , तहसीलदार, @वैभव पिल्लारे , तहसीलदार, @राजेश ऊनउने , पोलीस उप अधीक्षक, @चेतन मचले पोलीस निरीक्षक सातारा , @अविनाश पवार, अँटी करबशन मुंबई, @ सरनाईक, अधीक्षक जिल्हा न्यायालय, @शिवाजी वाडकर , अधीक्षक जिल्हा न्यायालय, @ॲड रवींद्र जानकर @इन्केट कॉलेजचे प्राचार्य नंदकुमार माळी, @महाराष्ट्रात नावाजलेले प्रख्यात गायक रवींद्र शिंदे, @सिने अभिनेता सागर तळाशिकर , @कर्नाटकात नावाजलेले प्रख्यात गायक चिदानंद कमतगी, @मुंबई स्थित बांधकाम व्यवसायिक जितेंद्र गायकवाड . @ज्येष्ठ उद्योजक हेमंत दुधाने , @ सरोज आयर्नचे दीपक जाधव , @अर्थ मुव्हर कॉन्ट्रॅक्टर अभय देशपाडे , @उधोजक प्रकाश मगदूम , @प्रा सिकंदर डांगे , @ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी,@ नवाब शेख , पत्रकार, @ लुमकांत नलवडे , पत्रकार, @प्रगतशील शेतकरी विजय जाधव, @यशस्वी व्यवसायिक भीमराव चौगले, @ज्येष्ठ व्यवसायिक सामाजिक कार्यकर्ते संजय स्वामी , @ नगरसेवक माजी उप महापौर संजय मोहिते, @ज्येष्ठ उद्योजक व माजी नगरसेवक उदय दुधाने , @ शिव छत्रपती पुरस्कार ने सन्मानित शर्मिला भोसले @शिव छत्रपती पुरस्कार ने सन्मानित छाया टेंगशे, @शिव छत्रपती पुरस्कार ने सन्मानित प्रकाश कारेकर @सुरेश चौगुले उप अधीक्षक उत्पादन शुल्क , याशिवाय अनेक मान्यवर आणि आपले जीवाभावाचे मित्र मैत्रिणी येणार आहेत…. त्यांच्याशी गप्पा , भेट , जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रविवारी दुपारी दोन वाजल्या पासून मुस्कान लॉन वर भेटू.
दरम्यान, – पाहिल्याच माजी विद्यार्थी संमेलनात विक्रमी 1 हजार माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज माजी विद्यार्थी संघटना ही अधिकृत , नोंदणीकृत संस्था आहे. अत्यंत उत्स्फूर्तपने माजी विद्यार्थी एकत्र येवून पाहिले माजी विद्यार्थी संमेलन दिनाक १५ फेब्रुवारी २०१५ रोजी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरात आयोजित केले होते. यावेळी कॉलेज मध्ये शिकवणाऱ्या सर्व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी एक हजार माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
– 2016 साली यांचा झाला होता सत्कार
दिनाक २१ फेब्रुवारी २०१६ रोजी आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरातच आयोजित केले होते. यावेळी कॉलेज मध्ये शिकताना आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळामध्ये उच्चतम कामगिरी केलेल्या मान्यवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला होता. यामध्ये विशेषतः रणजी क्रिकेट खेळणारे पांडुरंग साळगावकर , रमेश हजारे , अर्जुन पुरस्कार विजेत्या शैलजा साळोखे, शिव छत्रपती पुरस्काराचा मानकरी छाया टेंगशे , रमेश कुसाळे, प्रशांत कारेकर, हिंद केसरीपैलवान विष्णू जोशिलकर ,निवास जाधव , कुस्तीगर पी जी पाटील , बिभशन पाटील , शर्मिला भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
– यापूर्वी राबवण्यात आलेले विविध उपक्रम असे
आजी माजी विद्यार्थी एकत्र येवून कोटीतीर्थ तलाव येथे दसऱ्याच्या दिवशी टाकले जाणारे निर्माल्य व घट पाण्यात टाकू नका असे आवाहन करण्यात माजी विद्यार्थी यांचा पुढाकार घेवून गेली सहा वर्षे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. – स्वच्छता मोहिमेत माजी विद्यार्थी सहभागी झाले.- कोविड काळात औषध , अन्य व इतर मदत देण्यात आपल्या अनेक माजी विद्यार्थीनी जोखीम घेत मोठी कामगिरी पार पाडली.- चंद्रकांत चव्हाण यांचे नेतृत्वाने सिनियर विद्यार्थी यांनी शहरात वृक्षारोपण करून ते जगविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. – स्नेहसंमेलनात शिल्लक राहिलेले रक्कम नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचे दुष्काळ निर्मूलन व जल संधरण कामासाठी दिले.-
तसेच गोखले कॉलेजचे मुलींचे हॉस्टेलसाठी कॉट व फॅन असे साहित्य दिले.- मावुली केअर सेंटरसाठी व्हील चेअर व अन्य साधने दिली.
टीप : – खाजगी सुरक्षा व्यवस्था असल्याने कोणताही कटू अनुभव येण्या पेक्षा आपली प्रवेशिका सोबत ठेवा. तसेच घेतली नसेल तर आजच घ्या…नक्की या..????