“हॉकी स्टेडियम”ची उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करा
– माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना सूचना
– मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट देऊन घेतला उर्वरित कामांचा आढावा
– केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुढील महिन्यात मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला देणार भेट
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंसाठी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम मैदान अध्यायावत अँस्ट्रोटर्फने सुसज्ज बनविण्यात आले आहे. या मैदानावरील उर्वरित कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि.२०) माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. मैदानाची पाहणी केल्यानंतर उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना केल्या.
– केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची हॉकी स्टेडियमला पुढील महिन्यात भेट : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती
पुढील महिन्यांमध्ये मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर भेट देणार आहेत. यासंदर्भात माझी त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. त्यानुसार मैदानाच्या उर्वरित कामांचा आढावा घेतला आहे. ही उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत. या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचनाही यावेळी केल्या आहेत. महानगरपालिका प्रशासन व दि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट (जिल्हा) हॉकी असोसिएशनला स्टेडियमसह
अदयावत अँस्ट्रोटर्फने सुसज्ज हॉकी मैदानाची उर्वरित कामे तसेच निधी उपलब्धता आदी संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
– उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करून मैदान सुस्थितीत करण्याच्या सूचना
कोमनपा प्रशासनाच्या सहकार्याने व जिल्हा हॉकी असोसिएशन व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम व मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे अध्यायावत असे साकारले आहे. हे हॉकी मैदान कोल्हापूर जिल्ह्यातील हॉकी खेळाडूंना भविष्यात पर्वणी ठरणार आहे. तसेच खेळाडूंना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सराव, आयोजन व गाजवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. सध्या या हॉकी मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत अँस्ट्रोटर्फ बसवण्यात आले आहे. या मैदानावर अजूनही काही उर्वरित कामे बाकी असून यामध्ये चेंजिंग रूम, वसतिगृह (हाँस्टेल), लाईट सुविधा, मैदानावरील पाण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॉप-अप पद्धतीचे स्प्रिंकलरसाठी नवीन लाईटचा डीपी आदी कामांचा समावेश आहे. ही मैदानावरील उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करून मैदान सुस्थितीत करण्याच्या सूचनाही यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्या.
मैदानावर यांची होती प्रमुख उपस्थिती
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, कोमनपा माजी स्थायी समिती सभापत सरदार साळोखे, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांद्रे, वृषभ चौधरी, नझिर मुल्ला, क्रीडा शिक्षक प्रदीप पोवार, हॉकी प्रशिक्षक समीर जाधव, योगेश देशपांडे, मिलिंद शेलार, प्रकाश पैठणकर, सागर जाधव, श्वेता पाटील, दि डिस्ट्रिक्ट हॉकी असोसिएशन (कोल्हापूर जिल्हा) पदाधिकारी, सभासद खेळाडू आदी उपस्थित होते.