“हृदयस्पर्शी”तर्फे कौतुकासह मायेचा स्पर्श…!

- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

शाहू स्मारक भवन येथील सभागृहात “हृदयस्पर्शी”आयोजित स्नेहसत्काराचा समारंभात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व रचनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून “हृदयस्पर्शी”तर्फे कौतुकासह “मायेचा स्पर्श”करून पुढील प्रेरणादायी वाटचालीस कौतुकाची थाप दिली.

या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कला, साहीत्य, संगीत, चित्रपट, नाटय, शैक्षणिक, आरोग्य आदी विविध क्षेत्रात आपल्या लक्षवेधी कामगिरीने समाजाचे लक्ष वेधून घेतले अशा सर्वांचा यावेळी गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. यामध्ये अकरा वयीन बालकलाकाराने वाद्यांच्या दुनियेत सर्वाधिक कठीण असणारे सेक्सअफोन वाजवून सर्वांना मंत्रमुग्ध केलेल्या अर्हन मिठारी, वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, गुरुबाळ माळी, श्रीमती जयश्री जयशंकर दानवे, साहित्यिक पुरस्कार लाभलेले लेखक विकास कुलकर्णी, दीड वर्षांत जवळपास 200 हुन अधिक नेत्रशल्य चिकित्सा मोफत करून या शिबिराद्वारे 25 हजाराहून अधिक लोकांचे डोळे तपासलेले शा कृ पंत वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलचे नेत्रशल्य विशारद डॉ वीरेंद्र वनकुद्रे, पहिल्याच प्रयत्नात आणि पश्चिम महाराष्ट्रात मुलीत प्रथम क्रमांकाने सी . ए . परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कु.शीतल भिवटे, शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झालेले संभाजी जगदाळे, शिवाजी विद्यापीठ सिनेटपदी सर्वोच्च मताधिक्याने निवडून आलेले अभिषेक मिठारी व प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय परेडसाठी जिल्ह्यातील एकमात्र निवडलेली मुलगी कु वैष्णवी साळोखे यांचा समावेश आहे. या सर्वांचा स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि चिमण्याचे घरटे देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत आणि प्रस्तावना हृदयस्पर्श पद्माकर कापसे यांनी, वरिष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी सर्वांचा परीचय करून दिला. “गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताने या हृदयस्पर्शी सोहळ्याची सांगता झाली.

दरम्यान, यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, सचिव बाळासाहेब खाडे यांचाही सत्कार हृदयस्पर्शीचे पद्माकर कापसे यांच्या हस्ते करण्यात आला.

You may also like

error: Content is protected !!