भाजपा कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी लता पाटील यांची निवड

भाजपा कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी लता पाटील यांची निवड

– कोरोना काळातील कार्याची दखल घेऊन निवड

– जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते निवडीचे पत्र

– चंद्रे गावात जल्लोषात स्वागत

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली )

कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत राधानगरी तालुक्यातील चंद्रे गावच्या माजी उपसरपंच लता बळवंत पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र बुधवारी (दि.15 फेब्रुवारी 2023.) भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले.

जबाबदारीने कार्य पूर्ण करण्याला प्राधान्य द्या : शौमिका महाडिक

यावेळी बोलताना शौमिका महाडिक म्हणाल्या, जिल्ह्यासह तालुका पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला मोर्चातर्फे विविध उपक्रमाद्वारे कार्य सुरू ठेवले आहे. उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र दिल्यानंतर त्यांनी लता पाटील यांना महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्यक्रम देण्याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहावे, तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती करून घेण्यासाठी कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग व झूम मीटिंगला उपस्थित राहून महिलांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व संघटन वाढीसाठी सतत सक्रिय राहावे, पदे मिरविण्यासाठी नसून जबाबदारीने कार्य पूर्ण करण्यासाठी आहेत. त्यानुसार तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून काम करून घेणे व पक्षाच्या आदेशाप्रमाणे कार्यरत असणे आवश्यक आहे, अशा मार्गदर्शनपर सूचना केल्या.

विश्वास सार्थ ठरविणार : लता पाटील

जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना लता पाटील म्हणाल्या, यापूर्वी मी उपसरपंच म्हणून चंद्रे गावातील प्रलंबित विविध प्रश्नांची सोडवणूक केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना आरोग्य सुविधा व सेवा देऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे. यापुढेही जिल्हा अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी व संघटन बळकटीसाठी प्रयत्नशील राहणार आहे. महिला मोर्चाच्या माध्यमातून चांगले कार्य करून शौमिका महाडिक यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही, यावेळी त्यांनी दिली.

यावेळी माजी आमदार अमल महाडिक, चंद्रे येथील भाजपाचे नेते व राधानगरी तालूका काँट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस पाटील, यूवक नेते महेश पाटील, राधानगरी तालूका भाजपचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाङळकर, माजी उपसरपंच मनिषा गिरीबूवा, माजी उपसरपंच नेताजी साठी, माजी ग्रामपंचायत सदस्य रूपाली पाटील, तंटामूक्ती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्या सारिका गिरीबूवा, जयवंत पाटील, प्रविण पाटील आदींसह कार्यकर्ते व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

लता पाटील यांचे जल्लोषात स्वागत

चंद्रे गावच्या माजी उपसरपंच लता पाटील यांची भाजपा कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचे चंद्रे गावात आगमन झाल्यानंतर समर्थक, कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच काही ठिकाणी निवड व शुभेच्छांचे डिजिटल फलकही झळकविण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!