“यश’ ची चमकदार कामगिरी..!

  • – JEE MAINS Phase-१ परीक्षा उत्तीर्ण
  • – आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या “यश”सह आणखी
    3 विद्यार्थी यशस्वी
  • कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली )

आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या “यश” ने JEE MAINS Phase-१ मध्ये उत्तीर्ण होऊन चमकदार कामगिरी बजावली. त्याच्यासह या अकॅडमीच्या आणखी तिघे यशस्वी झाले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

– आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांचे यश

आत्मा मालिक एनडीए अकॅडमीच्या 4 विद्यार्थ्यांनी केले *JEE MAINS Phase-१* मध्ये यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमीचा कॅडेट यश सचिन कळंत्रे, कॅडेट विवेक कोंडाजी पवार, कॅडेट सार्थक नितीन आसने व कॅडेट ऋषिकेश संतोष पवार यांचा समावेश आहे. यावेळी बोलताना यशस्वी विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द, आणि चिकाटीच्या बळावर आत्मा मालिक संकुलाने JEE परीक्षेत मिळवले यश मिळाले असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

– उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमीचा कॅडेट यश सचिन कळंत्रे, कॅडेट विवेक कोंडाजी पवार, कॅडेट सार्थक नितीन आसने व कॅडेट ऋषिकेश संतोष पवार यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता बारावीत शिकत असून “एनडीए”चा अभ्यासही करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांनी JEE MAINS सारख्या परीक्षेत यश संपादन करून अकॅडमीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.

– अकॅडमीत आनंदाचे वातावरण

यापूर्वीही अकॅडमीचे *पाच* विद्यार्थ्यांची २०२० व २०२१ मध्ये भारतीय सैन्य दलात *लेफ्टनंट* पदावर निवड झालेली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी ४१ वेळा एस.एस.बी.मुलाखत दिलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संकुलात व अकॅडमीत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याच्या यशस्वीते बद्दल संत परिवार, अध्यक्ष, सर्व विश्वस्त, प्राचार्य, अकॅडमी चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You may also like

error: Content is protected !!