कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शितल धनवडे

  • फोटो ओळ : – कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी शितल धनवडे,  कार्याध्यक्षपदी दिलीप भिसे, उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर तर सचिवपदी बाबा खाडे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. डॉ. शिवाजी जाधव व शिवाजी विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर आदी उपस्थित.
  • कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी

  • शितल धनवडे

    – कार्याध्यक्षपदी दिलीप भिसे, उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर तर सचिवपदी बाबा खाडे यांची निवड.

    कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

    कोल्हापुरातील पत्रकारांची शिखर संस्था म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब च्या अध्यक्षपदी शितल धनवडे यांची निवड झाली. तर कार्याध्यक्षपदी दिलीप भिसे, उपाध्यक्षपदी प्रशांत आयरेकर व सचिव पदी बाबा खाडे यांची निवड झाली.

    निवडीनंतर नूतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन अध्यक्ष शितल धनवडे यांनी लहान – मोठा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच भविष्यात प्रलंबित प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा. डॉ. शिवाजी जाधव व शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अलोक जत्राटकर यांनी काम पाहिले. तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक म्हणून मोहन मिस्त्री, विजय केसरकर, उद्धव गोडसे, नंदकुमार तेली, राजेंद्र मकोटे व नयन यादवाड यांनी परिश्रम घेतले. सकाळी दहा ते चार या वेळेत मतदान झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एकूण मतदान झालेले मतदान, बाद झालेले मतदान, विजयी व पराभूत झालेल्या उमेदवारांना पडलेली मते, याविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच विजयी झालेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. आणि गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा केला.

    – चुरशीने 98% मतदान

    गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबची निवडणूक रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी उत्साहात पार पडली. या निवडणुकीत अत्यंत चुरशीने 98% मतदान झाले. एकूण 231 मतदानापैकी 223 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.

  • – निवडणुकीचा सविस्तर निकाल असा…1) अध्यक्षपदासाठी झालेले मतदान असे….शितल धनवडे  (दै. सामना) यांना 69 (07 मतांनी विजयी), भारत चव्हाण यांना 62, सुखदेव गिरी यांना 52 तर यशवंत लांडगे यांना 38 मते मिळाली.2) कार्याध्यक्ष पदासाठी झालेले मतदान असे….

    दिलीप भिसे (दै.पुढारी) यांना 117 (16 मतांनी विजयी) तर जितेंद्र शिंदे यांना 101 मते मिळाली.

    3) उपाध्यक्ष पदासाठी झालेले मतदान असे…

    प्रशांत आयरेकर (बी न्यूज ) 118 (15 मतांनी विजयी) तर भूषण पाटील यांना 103 मते मिळाली.

    दरम्यान, यानंतर कोल्हापूर प्रेस क्लबच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शीतल धनवडे, प्रशांत आयरेकर आणि दिलीप भिसे यांचे प्रेस क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पराभूत उमेदवार भारत चव्हाण, सुखदेव गिरी, यशवंत लांडगे, जितेंद्र शिंदे आणि भूषण पाटील यांनी ही निवडणूक खेळी मिळत पार पाडली. त्यांचंही मनापासून अभिनंदन करण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!