महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात महिलांना समान अधिकार दिला

महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात महिलांना समान अधिकार दिला

– कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचे प्रतिपादन

– प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राणी चन्नम्मा महिला मंडळतर्फे आयोजित स्पर्धा, कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)

महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात महिलांना समान अधिकार मिळवून दिला. त्यांचे विचार हे काळाच्याही पुढचे होते., असे प्रतिपादन कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे लिंगायत समाज संस्था राणी चन्नम्मा महिला मंडळ कोल्हापूर तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धा, फनीगेम्स (मनोरंजनात्मक खेळ) तसेच मकर संक्रांति निमित्त हळदी -कुंकू वाण आदी कार्यक्रमांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्या म्हणून कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी उपस्थित महिलावर्गाला मार्गदर्शन करताना तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, महिलांनी आपल्यातील सुप्त गुणांना वाव देऊन समाजात कर्तुत्वाने पुढे आले पाहिजे. महिलांनी फक्त गेम्स आणि हळदीकुंकू यात अडकून न राहता स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महिला मंडळाने विविध उपक्रम राबवावेत. यामध्ये महिलावर्गानेही उस्फुर्त सहभाग नोंदवून आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा., अशी सूचनाही त्यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी आपल्या जीवन कार्याची व आजपर्यंतच्या खडतर प्रवासाची माहिती उपस्थित महिला वर्गाला करून दिली. यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले.

– गणेश वंदना नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यानंतर श्रद्धा चितारी यांनी गणेश वंदना नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

– फनी गेम्स (मनोरंजनात्मक खेळ)

विणा पाटील यांनी विविध फनी गेम्स (मनोरंजनात्मक खेळ) घेतले. पाहुण्यांची ओळख वेदिका पाटील यांनी करून दिली.

–  महिला मंडळाच्या कार्याचा आढावा

स्वागत महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सावर्डेकर यांनी केले. यावेळी बोलताना सावर्डेकर यांनी महिला मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती सांगून महिला मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला.

– महात्मा बसवेश्वरांचे वचन गायन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरलाताई पाटील यांनी, सूत्रसंचालन वारणा वडगावकर यांनी तर महानंदा पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांचे वचन गायन केले. शुभांगी चितारी यांनी आभार मानले.


यावेळी कार्यकारी मंडळ सदस्या मंदाकिनी तंबाके , वैशाली पाटील, नंदा निर्वाणी, अर्चना हिडदुग्गी, श्वेता तारळी आदींसह समाजातील महिलावर्गाने उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.

फोटो ओळ : – लिंगायत राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्रीताई संतोष सावर्डेकर यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय लिंगायत संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तहसीलदार शिल्पा ठोकडे व महिला मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!