“वीरगाथा प्रोजेक्ट”चा विजेता फरहान मकानदारची शनिवारी स्वागत रॅली
– नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन हाजी असलम सय्यद यांची माहिती
कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी : निखिल तेली)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सन्मानित “वीरगाथा प्रोजेक्ट” चा विजेता नॅशनल अकॅडमीचा विद्यार्थी फरहान मकानदारची शनिवारी कोल्हापुरातील दसरा चौकातून स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. , अशी माहिती नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन हाजी असलम सय्यद वाईस चेअरमन राहीद खान व संचालक नासरखान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा 2.0 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता सातवीत् शिकणारा कु. फरहान राज मोहम्मद मकानदार या विद्यार्थ्याने कौतुकास्पद कामगिरीरून निवडक 25 विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकावले आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून 18 राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशातून वीस लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या विद्यार्थ्यांमधून फक्त 25 विद्यार्थी “सुपर 25” म्हणून निवडले गेले. कु. फरहान मकानदार हा महाराष्ट्रातून एकमेव् शालेय विद्यार्थी निवडला गेला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याला मानचिन्ह व रोख रुपये दहा हजार बक्षीस देऊन गौरवण्यात आले. फरहानला त्याचे पालक व नँशनल सोसायटीचे अध्यक्ष हाजी असलम सय्यद व संचालक श्री नासर खान यांचे मार्गदर्शन लाभले.
– स्वागत रॅली मार्ग असा…
फरहाचे दिल्लीहून कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर उद्या शनिवार दि. 28 जानेवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता दसरा चौकातून भव्य स्वागत रॅली काढण्यात येणार आहे. रॅली मार्ग असा, दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महानगरपालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे बिंदू चौक येथे रॅलीचा समारोप होणार आहे.