श्री पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण

श्री पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण

– श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाचे अध्यक्ष सुनील पाटील यांची माहिती

– शाहूपुरी कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाने जोपासली सामाजिक बांधिलकीची परंपरा

– गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० जानेवारीपासून

– गणेश जयंती निमित्त श्री पंचमुखी गणेश मंदिराच्या वतीने दि. २० ते २६ जानेवारी 2023 रोजीपर्यंत विविध धार्मिक विधी, सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

(कोल्हापूर : “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

शाहूपुरी 7 वी गल्लीतील कुंभार गल्लीमध्ये १९९५ साली स्थापन केलेल्या श्री पंचमुखी गणेश मंदिरास यावर्षी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासली आहे. श्री पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त मंडळातर्फे यंदाच्या वर्षीही विविध धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० जानेवारीपासून

गणेश जयंती २५ जानेवारी रोजी आहे. गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० जानेवारीपासून होणार आहे. २० ते २६ जानेवारी 2023 रोजीपर्यंत धार्मिक विधी, सामाजिक उपक्रम राबविण्यासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गणेश जयंतीच्या सप्ताहाची सुरुवात २० जानेवारी 2023 रोजीपासून होणार आहे. यंदाच्या वर्षीही परंपरागत जन्मकाळ सोहळा या मंदिरामध्ये साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये महाआरती, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, पारायण, भजन, श्रीगणेशाचा अभिषेक, जन्मकाळ व पालखी सोहळा असे विविध धार्मिक विधी, कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच २६ जानेवारी रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे. , अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष उदय कुंभार, उत्सव कमिटी अध्यक्ष शुभम कुंभार, उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव अरविंद जाधव, खजनिस शिवाजी बावडेकर, सतिश वडणगेकर, राजेश पठाण, उदय डवरी, अजय पाटील, सतिश कुंभार आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दशभुजा गणेश दर्शनाचा दुर्मिळ योग…!

शुक्रवार दि. 5 मे 2023 रोजी पुष्टीपती विनायक जयंती आहे. या दिवशी दशभूजा म्हणजे दहा हात (भुजा) असलेल्या गणपतीचे दर्शन घेणे व पुष्टीपती स्त्रोत वाचन करणे. याला या दिवशी फार महत्त्व आहे. राजयोग, लक्ष्मीयोग, पौर्णिमायोग यांचे तिन्हीच्या एकाच योगावर येणारा वर्षातील दुर्मिळ योग म्हणजे पुष्टीपती विनायकी होय. पुष्टीपती म्हणजे शारीरिक पुष्टी मिळून शारीरिक दर्शन घेणे. या दहा भूजांपैकी चार हात गणपतीचे व सहा हात शिव, विष्णू व शक्तीचे मानले जातात. (संदर्भ : गणेश कोश ). हा गणपती क्वचितच आढळतो. या गणपतीचे स्थान महाध्यानात असलेचे गणेश कोशमध्ये संदर्भ आढळतो. श्री पंचमुखी गणेश म्हणजे पाच शक्ती (पृथ्वी, आकाश, वायू, अग्नी, जल) यांनी जीवन जगण्यास शक्ती मिळते. हे या गणपतीचे वैशिष्ट्य आहे. दशभुजा गणपती क्वचितच आढळतो. नेपाळ, नाशिक, बेळगाव, पुणे यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी 7 व्या गल्लीमध्ये असलेल्या मंदिरामध्ये एकमेव “श्री पंचमुखी व दशभूजा गणेश मूर्ती” आहे.

 गेल्या 28 वर्षापासून जोपासली सामाजिक बांधिलकीची परंपरा

मंडळातर्फे श्री गणेशाच्या जन्मसोहळ्याबरोबरच आपणही समाजाचे देणे लागतो., या उदात्त हेतूने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात या अंतर्गत यावर्षीही रक्तदान शिबिर, फुले, हार, हराटी अशा निर्माल्यापासून खत निर्मिती करणे, धार्मिक ग्रंथालय व वाचनालय उभा करणे, बायोगॅसपासून सहयंत्र बनवणे, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणे, शाहूपुरी भागात येणाऱ्या पुरापासून संरक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे, गरजूंसाठी प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी, मंदिर फाउंडेशनच्यावतीने ऍम्ब्युलन्स सेवा, दंतचिकित्सा केंद्र सुरू करणे असे नियोजित उपक्रम राबवण्यात येणार आहेत. ही सामाजिक बांधिलकीची परंपरा मंडळाने गेल्या 28 वर्षांपासून जोपासली आहे.

मंदिरातर्फे राबवले जातात विविध सामाजिक उपक्रम

गेली अनेक वर्षे मंदिराच्यावतीने अंध,अपंग,वृद्ध यांच्या सामाजिक संस्थांना एक वेळ भोजन किंवा भोजनाचे साहित्य प्रदान केले आहे. भोगावती परिते येथील मुलांच्या वसतीगृहास पाणी तापवण्याचा बंब भेट दिला आहे. काटेभोगाव येथील गोशाळेत महिन्याभराचा चारा वाटप, सानेगुरुजी येथील कोविड सेंटरला कोरोना उपचार साहित्याचे वाटप केले आहे.

मोफत बाल संस्कार वर्ग

मंदिराचा स्वतःचा सांस्कृतिक हॉल आहे. त्या हॉलमध्ये भागातील मुलांसाठी मोफत बाल संस्कार वर्ग तसेच तलवारबाजी लाठीकाठी, कराटे, योगाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश वडणगेेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाते.

You may also like

error: Content is protected !!