‘बांबू’ चित्रपटात निखळ मनोरंजन…!

‘बांबू’ चित्रपटात निखळ मनोरंजन…!

– मराठी चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता तेजस्विनी पंडित यांची माहिती

– २६ जानेवारीला होणार ‘बांबू’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

 

प्रेमात बांबूच लागू नयेत (भ्रमनिरास/वाट लागणे) आणि तुमचे गेलेले प्रेम यू टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशी माहिती मराठी चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता तेजस्विनी पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच हा चित्रपट प्रेक्षक वर्गाला पाहण्यासाठी 26 जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितले

– क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत या चित्रपट

क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत या चित्रपटात मराठी चित्रपट प्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता तेजस्विनी पंडित व संतोष खेर, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडपलिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

– तरुणाईला भुरळ घालणारे
‘मी तुला त्या नजरेनं’ धमाल गाणे

चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरुणाईला भुरळ घालणारे आहे. हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांचे असून समीर सप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

– तरुणाईला आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा चित्रपट : दिग्दर्शक विशाल देवरूखकर

‘’ मुळात तरुणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. यूथला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरुणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला ‘बांबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.’’

चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम : निर्माती तेजस्विनी पंडित

‘’या टीमसोबत काम करताना खूप धमाल आली. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रत्येकानेच आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना ‘बांबू’ नक्कीच आवडेल.’’

प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट : निर्माते संतोष खेर

मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा ‘बांबू’ आहे.

You may also like

error: Content is protected !!