टिटास चॅटर्जी, आरेफ़अलि कोटवाल, व नयना बोडके यांना विजेतेपदाचा “मुकुट”

टिटास चॅटर्जी, आरेफ़अलि कोटवाल, व नयना बोडके यांना विजेतेपदाचा “मुकुट”

– गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स “सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४)” या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धा

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स “सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४)” या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत टिटास चॅटर्जी, आरेफ़अलि कोटवाल, व नयना बोडके यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपदाचा “मुकुट” पटकाविला.

– सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेचा सोहळा संपन्न…

गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स “सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत २०२३ (सीझन ४)” या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेचा सोहळा सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे मोठ्या दिमाखात ९ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला. गौरी नाईक आणि जयंत पाटील यांनी आयोजित केलेल्या या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेची सुरुवात मोठ्या थाटामाटात झाला. संजय घोडावत ग्रूपचे चेअरमन संजय घोडावत, ट्रस्टी विनायक भोसले , सरस्वती साडी डेपोचे संचालक शंकर दुल्हानी , आर्यन दुल्हानी , माणिकचंद आटा ग्रूपचे प्रकाश आर. धारीवाल, गिरीश शहा व फॉर्चून ग्रूपचे चेअरमन वीरेन शहा यांच्या सहयोगाने सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे ६,७,८ जानेवारीला तिन दिवसांचे ग्रूमिँग गौरी नाईक व पेजन्ट कोच चैतन्य गोखले यांच्याकडून घेण्यात आले. तर ग्रँड फीनालेचा सोहळा ९ जानेवारी 2023 रोजी संपन्न झाला. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून 300 ऑडिशन्स घेण्यात आले व त्यातून अंतिम 36 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

या चार दिवसीय राष्ट्रीय “फॅशन
शो” स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांची नावे अशी…

मिस गट विजेते…

मिस गटामध्ये कोलकत्ता ( पश्चिम बंगाल ) येथील टिटास चॅटर्जी विजेती, पाहिली उपविजेती श्रुती साळवे अहमदनगर ( महाराष्ट्र ) तर दुसरी उपविजेती इशा भोसले कोल्हापूर ( महाराष्ट ) ठरली.

मिस्टर गट विजेते…

मिस्टर गटामध्ये उस्मानाबाद ( महाराष्ट्र ) येथील आरेफ़अलि कोटवाल विजेता, पाहिला उपविजेता सातारा ( महाराष्ट्र ) येथील आदित्य धानधरपाळे तर कोल्हापूर ( महाराष्ट्र ) येथील रुद्र श्रावस्ती दुसरा उपविजेता ठरला.

मिसेस गट विजेते…

मिसेस गटामध्ये नाशिक ( महाराष्ट ) येथील नयना बोडके विजेती, पाहिली उपविजेती दिपाली करमुसे पुणे ( महाराष्ट्र ) तर दिल्ली येथील मनीषा वर्मा दुसरी उपविजेती ठरली. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते विजेत्याचा गौरव करण्यात आला.

– यांनी पाहिले परीक्षकांचे काम…

रजनीश दुग्गल (मि.इंटरनेशनल , ग्रासिम मि.इंडिया २००३ ) , मिलिंद गुणाजी (अभिनेता , मॉडेल ) , डॉ. श्रद्धा जवानजाल ( प्रेसीडेंट सहारा नर्सिग एजुकेशन ) , सीमा अनिल इन्ग्रोले ( चेअरमन SDR फाउंडेशन ) व गौरी नाईक ( फाउंडर डाइरेक्टर , गौरा फॅशन क्लब ) यांनी परीक्षकांचे काम पाहिले. तसेच भारत सुरती ( जेड ब्लू ) यांनी मेन्स लाइफ स्टाइल पार्टनर व एफ हीना ब्युटीकचे संचालक सायपन इनामदार यांनी लेडीज डिज़ाइनर पार्टनर म्हणून सहकार्य केले. मेकअप पार्टनर म्हणून LTA स्कूल ऑफ ब्यूटीचे संचालक वैशाली के.शहा, बिजू नायर व सेलेब्रिटी मेकअप आर्टिस्ट सुप्रिया शिंदे यांनी काम पाहिले. तसेच संदीप पाटील व स्वाती बाल्टे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

– यांनी दिल्या सर्व स्पर्धकांना भेट वस्तू …

भारत सुरती ( जेड ब्लू ) , डॉ अजित राजीगरे ( सार्थ आयुर्वेदा ) , बाबुराव चव्हाण ( धनलक्ष्मी ज्वेलर्स ) , शैलेजा दुनुन्ग ( हॉटेल संस्क्रुती ) यांनी सर्व स्पर्धकांना भेट वस्तू दिल्या.

– यांनी घेतले विशेष परिश्रम

गौरा इवेंट्सच्या संचालिका गौरी नाईक व संचालक जयंत पाटील यांनी राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रायोजक व उपस्थित मान्यवरांचे यावेळी गौरी नाईक व संचालक जयंत पाटील यांनी आभार मानले.

You may also like

error: Content is protected !!