दोन दिवसीय “भक्ती उत्सव 2023″चे आयोजन

– वैदिक धर्म संस्थानच्या महाराष्ट्र समन्वयक डॉ.राजश्री पाटील यांची माहिती

– कळंबा येथील तपोवन मैदानावर श्री श्री रवी शंकर जी यांच्या सानिध्यात दि. 31 जानेवारीला “महासत्संग”  तर 1 फेब्रुवारी 2023 रोजी “महालक्ष्मी होम”चे आयोजन

– भक्ती उत्सवात लाखो नागरीक होणार सहभागी

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

कळंबा येथील तपोवन मैदानावर श्री श्री रवी शंकर जी यांच्या सानिध्यात दोन दिवसीय “भक्ती उत्सव 2023″चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत
दि. 31 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता “महासत्संग” तर 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 वाजता “महालक्ष्मी होम”  विधी होणार आहे. या भक्ती उत्सवात लाखो नागरीक सहभागी होणार आहेत., अशी माहिती वैदिक धर्म संस्थानच्या महाराष्ट्र समन्वयक डॉ.राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना डॉ.पाटील म्हणाल्या, गुरुदेव बारा वर्षानंतर शहरात येत आहेत. त्यांच्या मुक्त आणि आनंदी समाज निर्माण करण्याचा त्यांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता महासत्संग – संगीत, ज्ञान चर्चा आणि ध्यान होणार आहे. तसेच 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता वैदिक पंडितांकडून महालक्ष्मी होम केला जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम गुरुदेवांच्या सानिध्यात होणार आहेत. तसेच हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले असणार आहेत. यानंतर डॉ पाटील यांनी, महालक्ष्मी होम नंतर गुरुदेव एक फेब्रुवारीला करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत. गुरुदेव महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून ते नांदेड, वाटुर, तुळजापूर आणि पुणे येथे जाणार आहेत. वाटूर येथे ते नदी पुनर्जीवन प्रकल्पांना भेट देणार आहेत, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना डॉ पाटील म्हणाल्या, आर्ट ऑफ लिविंगतर्फे “भक्ती की लहर” या प्रकल्पांतर्गत गेल्या महिनाभर महाराष्ट्रभर सर्वत्र गावोगावी गुरुपूजा, सत्संग, ध्यान आदींचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचा लाभ लाखो नगरीकांना झाला आहे. या अंतर्गत व्यसनमुक्ती, प्रबोधन, रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी आणि दंत तपासणी व उपचार आदी समाज उपयोगी प्रकल्प राबविण्यात आले. आर्ट ऑफ लिविंगने लोकांचे हित लक्षात ठेवून महाराष्ट्रातील 33 हून अधिक नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे, असे सांगितले.

या पत्रकार परिषदेला आर्ट ऑफ लिविंगचे विश्वस्त प्रदीप खानविलकर, गीतांजली चिन्ननावर, अनिता दहिभाते, सचिन मुधाळे, प्रशिक्षिका डिंपल गजवानी आदी उपस्थित होते.

You may also like

error: Content is protected !!