(फोटो : फोटो संग्रहित)
बीजेएमने बालगोपालला 1 – 1 बरोबरीत रोखले
– केएसए (ए डिव्हिजन-वरिष्ठ गट) फुटबॉल लीग स्पर्धा
– पहिल्या सामन्यात झुंजारची सम्राटनगरवर मात
– 15 जानेवारीपर्यंत सामन्यांना ब्रेक..!
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या केएसए वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात बीजीएम स्पोर्ट्स संघाने बालगोपाल संघाला 1-1 गोल बरोबरीत रोखले. तर पहिल्या सामन्यामध्ये झुंजार क्लबने सम्राट नगर फुटबॉल क्लबचा 1 – 0 गोलने पराभव करून आपल्या गुणतक्त्यात तीन गुणांची भर टाकली.
दुपारी चार वाजता झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये बालगोपाल व बीजीएम स्पोर्ट्सच्या खेळाडूंनी वेगवान खेळायला सुरुवात केली. बालगोपालकडून सुरज जाधव, ऋतुराज पाटील, अभिनव साळुंखे, व्हिक्टर, शुभम जाधव यांनी उत्कृष्ट चाली रचत बीजीएम संघावर गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यांचे हे प्रयत्न बचाव फळीने फोल ठरवले यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात साबण याच्या 61 व्या मिनिटाला बालगोपालला गोल करण्यात यश मिळाले बालगोपालकडून सुरेश जाधवने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी जास्त काळ टिकली नाही. अवघ्या पाचच मिनिटाच्या अंतराने म्हणजेच 66 व्या मिनिटाला प्रतिहल्ला चढवत बीजीएमकडून निधीबोसी ऑपेरा याने मैदानी गोल करत संघाला 1 – 1 गोलची आघाडी मिळवून दिली. बीजीएमकडून कपिल शिंदे, वैभव राऊत, अभिजीत साळुंखे, केवल कांबळे यांनी चांगला खेळ केला. तसेच साहिल खोत व संकेत जरग यांनी गोल करण्याची सोपी संधी दवडली सामना पूर्ण वेळ 1-1 गोल बरोबरीत राहिला.
दुपारी दोन वाजता झालेल्या पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने सम्राटनगर फुटबॉल क्लबचा 1 – 0 गोलने पराभव केला. झुंजार क्लबच्या राजेश बोडेकरने सामन्याच्या उत्तरार्धात 57 व्या मिनिटाला एकमेव मैदानी गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. झुंजार क्लबकडून आकाश बावकर, अवधूत पाटोळे, प्रथमेश भाटे, कार्लोस नाला यांनी तर सम्राटनगरकडून अभिराज काटकर, अक्षय सावंत, यासीन नदाफ, कलेन डायमंड यांनी चांगला हे केला. सम्राटनगरच्या अभिराज काटकरने मारलेली पेनल्टी झुंजार क्लबचा गोल्डकिपर यशराज नलवडे याने तटवला. झुंजार क्लबने सामना 1- 0 गोलने जिंकला.
15 जानेवारीपर्यंत सामान्यांना ब्रेक..!
संतोष चषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी व मैदानाच्या सज्जता ठेवण्यासाठी छत्रपती शाहू स्टेडियमवरील सुरू असलेले केएसए “ए डिव्हिजन” फुटबॉल लीग अंतर्गत सामने होणार नाही आहेत. यामुळे सामन्यांना 15 जानेवारीपर्यंत ब्रेक लागला आहे.