चूरशीच्या सामन्यात दिलबहार विजयी

  1. ( फोटो : संग्रहित फोटो ).

चूरशीच्या सामन्यात दिलबहार विजयी

– जुना बुधवार पेठवर 2 – 0 गोलने मात

– कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ सामना राहिला 1-1 बरोबरीत

– केएसए “ए” डिव्हिजन साखळी फुटबॉल स्पर्धा (2022 – 23).

 

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)

 

छत्रपती शाहू स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए “ए” डिव्हिजन साखळी फुटबॉल स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने संयुक्त जुना बुधवार फुटबॉल संघावर 2 विरुद्ध 0 गोलने मात केली. तर कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.

दिलबहार विरुद्ध जुना बुधवार पेठ संघातील सामना चूरशीचा झाला. दिलबहारकडून रोहन दाभोळकर, जावेद जमादार, सत्यजित साळोखे, सुशांत अतिग्रे यांनी तर जुना बुधवारकडून सचिन मोरे, अभिषेक भोसले, प्रकाश संकपाळ, रविराज भोसले, रिची मोड यांनी चांगला खेळ करून विविध चाली रचत प्रतिस्पर्धी संघांवर गोल करण्याचे प्रयत्न केले. दिलबहारच्या इमॅन्युएल इचिकंडीने मध्यंतरास काही मिनिटे बाकी असताना उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला 1 – 0 गोलची आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात ही आघाडी राखण्यात बिरबलच्या खेळाडूंनी यश मिळवले.

उत्तरार्धात बुधवार पेठने वेगवान खेळ करुन गोल आघाडी कमी करण्याचे प्रयत्न केले. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले. 49 व्या मिनिटाला दिलबहारच्या इमॅन्युएल इचिकंडीने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करून संघाला 2 – 0 गोलची निर्विवाद विजयाची आघाडी मिळवून देत विजयात मोलाचा वाटा उचलला.
या विजयाबरोबर दिलबहार तालीम मंडळाने 3 गुणांची कमाई केली.

आजचे (गुरुवार दि.29) सामने :

1) दु. 2 वाजता : – उत्तरेश्वर तालीम मंडळ विरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ.

2) दु. 4 वाजता : – पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब.

You may also like

error: Content is protected !!