ओमकार बुधले व पिंकेश ठक्कर अजिंक्य

ओमकार बुधले व पिंकेश ठक्कर अजिंक्य

– “रॉयल रोडिओ” स्पर्धेत ५०० हुन अधिक स्पर्धकांचा सहभाग

रॉयल रायडर्स व मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने
तीन दिवसीय “रॉयल रोडिओ” स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी स्वरूप तेली)

रॉयल रायडर्स एक्सपर्ट क्लब क्लास स्पर्धेत ओमकार बुधले तर
हिरो क्लास स्पर्धेत पिंकेश ठक्कर अजिंक्यपद पटकविले.

– रॉयल रायडर्स व मोहिते रेसिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हुपरी सांगवडे रोडजवळील मोहितेज रेसिंग अकॅडेमीच्या ट्रॅकवर देशातील सर्वात मोठी अशी “रॉयल रोडिओ” या स्पर्धेचे १६ ते १८ डिसेंम्बर या तीन दिवसासाठी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये देशविदेशातील ५०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.

– १६ डिसेंबर रोजी ऑटो क्रॉस व १७ डिसेंबर रोजी एमटीबी सायकल सुपर क्रॉस तर १८ डिसेंबर रोजी मोटरसायकल सुपरक्राॅस रेसिंग स्पर्धा झाल्या. तसेच मोटर बाईकचे एक्सपो प्रदर्शनही याठिकाणी भरविण्यात आले होते.

– १६ डिसेंबर रोजी ऑटो क्रॉस या स्पर्धा झाल्या.मोटरसायकल आणि स्कूटर ऑटो क्रॉस स्पर्धा ही सकाळी सुरू झाली. यात ९ वेगवेगळ्या प्रकारातील स्पर्धा झाल्या.

– ८०० मीटरच्या ट्रॅकवर झालेल्या या स्पर्धेत मोटर सायकल, बाईक, स्कुटर(मोपेड)व प्रथमच ई व्हेईकल इलेक्ट्रॉनिक स्कूटर अशा गटात झाल्या. बाईकच्या सीसी गटामध्ये ही स्पर्धा टाइमट्रायल पद्धतीने झाली. या स्पर्धेत एकूण १०० स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या गो कारटिंग डांबरी ट्रॅकवर झाली.

असा आहे ऑटो क्रॉस स्पर्धेचा निकाल…

– महिला मोटरसायकल मध्ये प्रथम सुहानी पाटील, दुसरा आदिती शिंदे तिसरा क्रमांक मृण्मयी चौगुले हिने पटकाविला.

– महिला स्कूटरमध्ये प्रथम सुहानी पाटील द्वितीय आदिती शिंदे तर तृतीय क्रमांक नेहा माने यांनी मिळविला.

– इंडियन ओपन २५० सीसीमध्ये प्रथम अक्षय कारेकर, द्वितीय इमरान सी तर तृतीय क्रमांक अभिमन्यू राय यांनी मिळवला.

– इंडियन ओपन २०० सीसी मध्ये प्रथम अभिमन्यू राय, द्वितीय सबीर सागर, तृतीय क्रमांक अक्षय कारेकर यांनी पटकावला.

– इंडियन ओपन ४०० सीसी मध्ये प्रथम क्रमांक अक्षय कारेकर, द्वितीय सबीर सागर तर तृतीय अभिमन्यू राय यांनी पटकाविला.

– स्कूटर ओपन मध्ये प्रथम नीरज वांजले, द्वितीय अक्षय कारेकर आणि तृतीय क्रमांक अहमद डी यांनी पटकाविला.

– इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये प्रथम नीरज वांजले, द्वितीय महेश चौगुले तर तृतीय क्रमांक योगेश कागले यांनी पटकाविला.

– रॉयल इन्फिल्ड ३५० सीसीमध्ये प्रथम महेश चौगुले, द्वितीय करण गवळी, तृतीय क्रमांक सागर गावडे यांनी मिळविला.

– रॉयल एनफिल्ड ५०० सीसी मध्ये प्रथम महेश चौगुले, द्वितीय योगेश कागले तर तृतीय क्रमांक सारीजय अथने यांनी मिळविला.

– रॉयल एनफिल्ड ६५० सीसी मध्ये प्रथम रणवीर राजे-भोसले, द्वितीय ओमकार बुधले तर तृतीय क्रमांक योगेश कागले यांनी मिळविला.

– १७ डिसेंबर रोजी एमटीबी सायकल सुपर क्रॉस स्पर्धा झाली. एम.टी.बी सुपर क्रॉस ही स्पर्धा देशात फ़क्त कोल्हापूरमध्ये सुपर क्रॉस ट्रॅकवर झाली.

– देशभरातून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. एकूण २०० स्पर्धकांचा सहभाग असणारी ही स्पर्धा एकूण पाच वयोगटात झाली. एकूण ९०० मीटर अंतराच्या ऑफ रोड ट्रॅकवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत १४ वर्षाच्या आतील ,१७ वर्षाच्या आतील, १८ ते ३० वयोगट, ३१ ते ४५ वयोगट व ४५ वर्षावरील वयोगट सहभागी झाले होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा …

एमटीबी सुपर क्रॉस ओपन मध्ये प्रथम तेजस सांगावकर द्वितीय अश्विन मर्ढेकर आणि तृतीय क्रमांक सुजित कारंडे यांनी मिळविला. तर एमटीवी सुपर क्रॉस विनर अंडर १४ मध्ये प्रथम अक्षय हुपले, द्वितीय रेयांश बुधले आणि तृतीय क्रमांक प्रथमेश इंगरोले यांनी पटकाविला.

– रविवारी (१८ डिसेंबर 22) रोजी मोटरसायकल सुपर क्रॉस रेसिंगची स्पर्धा झाली. वेगवेगळ्या २२ प्रकारच्या गटात ही स्पर्धा झाली असून बाईक मधील सर्व प्रकार यात सहभागी झाले होते.

– रॉयल रोडीओ सुपरक्राॅस २०२२
रेस रिझल्ट

*12 वर्षाखालील गट*

1 अक्षत हुपले.
2 दर्शित चव्हाण.
3 साहिल शिवलकर.

*१६ वर्षाखालील गट*

1 अक्षत हुपले.
2 दर्शित चव्हाण.
3 साहिल शिवलकर.

*स्कूटर (पुरुष)*

1 पिंकेश ठक्कर.
2 अनिकेत कुमामेकर.
3 निरज वांजळे.

*स्कुटर (महिला)*

1 सुहानी पाटील.
2 अदिती शिंदे.
3 मृण्मयी चौगुले.

*मोटारसायकल खुला (महिला)*

1 सुहानी पाटील.
2 अदिती शिंदे.
3 अश्विनी चौगुले.

*इंडियन (नवोदित)*

1 पुष्कर घोरपडे.
2 आतीब मुजावर.
3 अलसमद मुल्ला.

*4 स्ट्रोक ओपन*

1 पिंकेश ठक्कर.
2 मोहम्मद शरीफ चांदकोटी.
3 विश्वविजय कांबळे.

*भारतीय मोटरसायकल (खुला गट)*

1 अशपाक मुल्लानी.
2 पिंकेश ठक्कर.
3 भूषण भोसले.

*इंडियन 2 स्ट्रोक*

1 पिंकेश ठक्कर.
2 अशपाक मुल्लानी.
3 महंमद शरीफ चांदकोटी.

*महाराष्ट्र लोकल*

1 पुश्कर घोरपडे.
2 पिंकेश ठक्कर.
3 विश्वविजय कांबळे.

*कोल्हापूर लोकल (नवोदित)*

1 युवराज बडकत.
2 रामा नंदनवाडी.
3 सुशांत राणे.

*रॉयल एंफिल्ड 350cc*

1 अनिकेत कुमामेकर.
2 पिंकेश ठक्कर.
3 हितेश घाडगे.

*रॉयल एंफिल्ड 500cc*

1 हितेश घाडगे.
2 महेश चौगुले.
3 अमेय काकडे.

*रॉयल इनफिल्ड ६५०cc*

1 पिंकेश ठक्कर.
2 ओमकार बुधले.
3 श्रीनिकेतन कुलकर्णी.

*रॉयल एंफिल्ड हिमालयन*

1 पिंकेश ठक्कर.
2 अनिकेत कुमामेकर.
3 हितेश घाडगे.

*रॉयल एंफिल्ड (खुला गट)*

1 पिंकेश ठक्कर.
2 अनिकेत कुमामेकर.
3 महेश चौगुले.

*45 वर्षा वरील गट*

1 सचिन घोरपडे.
2 विजय पाटील.
3 अजित पाटील.

*इंडियन 125*

1 अशपाक मुल्लानी.
2 अतीब मुजावर.
3 संजय कोकाटे.

*रॉयल रायडर्स एक्सपर्ट क्लब क्लास*

1 ओमकार बुधले.
2 श्रीजय अथने.
3 श्रीनिकेतन कुलकर्णी.

*हिरो क्लास*

1 पिंकेश ठक्कर.
2 अशपाक मुल्लानी.
3 महंमद शरीफ चांदकोटी.

*एक्स्पो प्रदर्शन…!*

एक्स्पो प्रदर्शनात मोहिते सुझुकी, मोटर इंडिया, रॉयल इनफिल्ड, जावा,एस, बी,मोटो व्हॉल्ट, केटीएम,हिरो, अँटर (इलेक्ट्रो), ट्रायम्प, बायकल कटरा, ग्लान्झ कार केअर आदी या कंपन्यांचे स्टॉल लावण्यात आले होते.

दरम्यान, या तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण रिटायर्ड लेफ्टनंट कर्नल सोहम रॉय, युनिक ऑटो मोबाईलचे रौनक चोरडिया, उद्योगपती अण्णासाहेब मोहिते, शिवाजी मोहिते, अभिषेक मोहिते, ध्रुव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेचे संयोजन समितीचे अध्यक्ष जयदीप पवार, सदस्य अभिजीत काशिद, राजीव लिंग्रस, योगेश पाटील संदीप माने,उदय पाटील,वैभव बेळगावकर यांनी केले होते.

You may also like

error: Content is protected !!