फोटो ओळ : डावीकडून यावेळेचा विश्वविजेता संदिप दिवे, प्रशिक्षक अरूण केदार, गतवेळेचा विजेता प्रशांत मोरे, अभिजीत त्रिपणकर,
महम्मद गुफ्रान आदी भारतीय टीम मधील महाराष्ट्रचे कॅरमपटूं उपस्थित.
कॅरम विश्वविजेत्या प्रशांत मोरेला प्रथम मानांकन
– कोल्हापुरात प्रथमच दि. 10 ते 12 डिसेबर 2022 या कालावधीत होणार राज्य मानांकन कॅरम स्पर्धा
– आयुब जमादार फौडेशनतर्फे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” : विशेष प्रतिनिधी निखिल तेली).
कोल्हापुरात होणाऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेकरीता मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया) यास प्रथम मानांकन देण्यात आले आहे. आयुब जमादार फौडेशनतर्फे महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्याने कसबा बावडा येथील श्रीराम सोसायटी हाॅलमध्ये दि. 10 ते 12 डिसेबर 2022 या कालावधीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
– स्पर्धेचे उद्घाटन
स्पर्धेचे उद्घाटन फौंडेशनचे अध्यक्ष आयुब जमादार यांच्या हस्ते पंढरीनाथ मांडरे, अरमान हेरेकर जुबेर,कैफ जमादार,अॅड.विवेक घाटगे, अरूण केदार, यतीन ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
– स्पर्धेतील लढती
दि. 10 ते 12 डिसेबर 2022 या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 वेळेत स्पर्धेतील लढती होणार आहेत.
– आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग
आंतरराष्ट्रीय कॅरमपटूं व
श्नी शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशांत मोरे, संदिप दिवे, योगेश परदेशी, प्रकाश गायकवाड, रियाज अकबर, संदीप देवरूखकर, योगेश घोंगडें,अणिल मुंढे, पंकज पवार व कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित त्रिपणकर आदी नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
– पहिल्या आठ विजेत्यांना एकूण 70 हजार रोख व चषक
या स्पर्धेसाठी एकूण रोख रूपये 70 हजार व आयुब जमादार चषक पहिल्या आठ कॅरमपटूंनां देऊन गौरविण्यात येणार आहे.
या राज्य मानांकन स्प्रर्धेसाठी प्रिसाईज कॅरम कंपनीचे क्लासिक बोर्ड वापरणेत येणार आहे. या स्प्रर्धा अखिल भारतीय कॅरम महासंघाचे नियमानुसार खेळविण्यात येणार आहे.
– सत्कार व रोख बक्षीस
उपांत्यपूर्व फेरीपासून “ब्रेक टू फिनिश” व “ब्लॅक टू फिनिश” करण्यात येणाऱ्या कॅरमपटूंना रूपये 500 देणेत येणार आहे.
आयुब जमादार (फौडेशन)
यांच्या हस्ते विश्वविजेत्या कॅरमपटूंचा व प्रशिक्षक यांचा सत्कार होणार आहे.
– स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी हे घेत आहेत परिश्रम
या स्पर्धेचे आयोजन अरूण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली, विजय जाधव, अभिजीत मोहिते यतीन ठाकूर, अख्तर शेख अरमान हेरेकर जुबेर ल कैफ जमादार, सचिन देसाई आदी
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी
परिश्रम घेत आहेत.