“कोल्हापूर सिंगिंग आयडॉल”
17 डिसेंबर रोजी
– विरासत फौंडेशनचा उपक्रम
– 15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी स्वरूप तेली)
संगीताची सुप्त इच्छा असणार्या हौशी व नवोदित गायकांना हक्काचे सांगीतिक व्यासपीठ मिळावे., या उद्देशाने कोल्हापूरातील विरासत फाऊंडेशनच्या वतीने ‘कोल्हापूर सिंगिंग आयडॉल’ या गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेच्या दोन फेऱ्या पार पडणार आहेत. प्राथमिक फेरी 17 डिसेंबर 2022 रोजी शनिवारी सकाळी ठिक १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे होणार आहे.
15 डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक
यामध्ये १५ वर्षापुढील वयोगटातील हौशी स्पर्धकाने
प्राथमिक फेरीसाठी स्वत:च्या आवडीचे मराठी किंवा हिंदी गाणे कराओकेसहीत सादर करायचे आहे. १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. प्राथमिक फेरीचा निकाल त्याचदिवशी जाहीर करण्यात येतील. अंतीम फेरी रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता वाद्यवृंदाबरोबर प्रत्यक्षात होणार आहे.
विजेत्यांना : रोख रक्कम व प्रशस्तीपत्र
प्रथम,द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार,७ हजार,५ हजार, दोन उत्तेजनार्थ विजेत्यांना १ हजार अशी रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विरासत फाऊंडेशनचे तेजस यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये हौशी व नवोदित कलाकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विरासत फौंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला रणजित बुगले, केतकी जमदग्नी महाजन, तेजस अतिग्रे, प्रेषिता पुसाळकर, शिल्पा पुसाळकर,भक्ती गांधी, गिरीश बारटक्के, मीना पोतदार,संदीप ताशीलदार उपस्थित होते.