“चेतन”ने लोकसभा निवडणूक लढवावी : गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके

– कोल्हापुरात “इंडियन डेअरी फेस्टिवल – 2023” चे आयोजन

– गोकुळ संचालक चेतन नरके यांची माहिती

– इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने कोल्हापुरात “इंडियन डेअरी फेस्टिवल 2023” चे आयोजन

– दि. 20 ते 22 जानेवारी 2023 या काळात होणार फेस्टिवल

– चेतनने लोकसभा निवडणूक लढवावी : गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांची घोषणा

 

कोल्हापूर : ( “मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली.)

 

“नांदी… नव्या धवलक्रांतीची” हे घोषवाक्य घेऊन दि. 20 ते 22 जानेवारी 2023 या काळात “इंडियन डेअरी फेस्टिवल 2023” चे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन डेअरी असोसिएशन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्या सहकार्याने कोल्हापुरात “इंडियन डेअरी फेस्टिवल 2023” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच यावेळी “चेतन”ने निवडणूक लढवावी आणि त्यांना निवडून आणणारच, अशी घोषणा गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी केली.

यावेळी बोलताना चेतन नरके म्हणाले, सद्यस्थितीतील पशुधन, डेअरी क्षेत्रातील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या बळावर अधिक गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन संकलन, प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, यातून फायदेशीर पशुपालन डेअरी उद्योग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांतील सहकारी आणि खाजगी दूध संघ, देशातील डेअरी उद्योगातील सर्व सहयोगी घटक या फेस्टिवलमध्ये सहभागी होणार आहेत. कोल्हापुरात अशा प्रकारच्या फेस्टिवलचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे.

हॉटेल सयाजी येथे दूध परिषद

फेस्टिवल मधील विविध उपक्रमातून देशातील दुग्ध व्यवसायासमोरील संधी आव्हाने, दूध उत्पादन वाढ आणि 2030 पर्यंतची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ, सर्व घटक आणि शासन व्यवस्था यांना एकत्रित घेऊन हॉटेल सयाजी येथे दूध परिषदेचेही आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल अंतर्गत उत्पादक शेतकऱ्यांपासून तूच संस्था दूध प्रक्रिया संघ आणि ग्राहक या सर्व घटकांना लागणारी आवश्यक माहिती तंत्रज्ञान एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदानावर भव्य डेअरी एक्सपो होणार आहे. तसेच या उद्योगात काम करणाऱ्या आणि हा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्व पशुसंवर्धन आणि डेहरी उद्योगाची माहिती करून देणारे एक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच या सर्व उपक्रमांचे एका व्यापक चळवळीत रूपांतर करण्यासाठी विविध माध्यमातून याचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी पुढील एका वर्षातील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. नव्या पिढीचा सहभाग या क्षेत्रात वाढविण्यासाठी या उद्योगाचे अर्थकारण तंत्र महत्व मार्गदर्शन समजून देण्यासोबत सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये डेरी उद्योगाचा वाटा वाढविण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांना गती देण्याच्या दृष्टीने या फेस्टिवलचे महत्व अनन्य साधारण आहे. दूध उत्पादक सर्व दूध संस्था आणि डेअरी उद्योगातील सर्व घटकांच्या दृष्टीने या फेस्टिवलचे आयोजन अतिशय महत्त्वाचे आहे. असेही यावेळी चेतन नरके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर व पुणे या भागातील दूध संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

—–———————————————–

 

चेतनने यांनी लोकसभा लढवावी : गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके

गोकुळचे संचालक चेतन नरके हे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी दूध उत्पादक व अन्य प्रश्न संदर्भात दिल्लीत प्रतिनिधी करण्यासाठी हक्काचा माणूस पाहिजे. यासाठी चेतन नरके यांनी निवडणूक लढवावी आणि त्यांना निवडून आणणारच, अशी घोषणा गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी केली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार असतील असेही अरुण नरके यांनी यावेळी जाहीर केले.

गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांनी, लोकसभेत कोल्हापूरचे प्रश्न मांडणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी हवा. सहकार बँकिंग दुग्ध व्यवसाय शेतकरी यासह सर्व घटकांची माहिती असणारा अभ्यासू लोकप्रतिनिधी संसदेत प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे. चेतन नरके यांच्याकडे अभ्यास वृत्ती आहे. सहकार बँकिंगचा अभ्यास आहे. या सगळ्या प्रश्नांची लोकसभेत मांडणी करण्यासाठी चेतन नरके यांच्यासारखा उमेदवार लोकसभेत हवा. चेतन नरके यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवावी‌. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी करावी, आगामी लोकसभा निवडणुकीत ते उमेदवार असतील. त्या निवडणुकीत त्यांना निवडून आणणार, अशी घोषणाही अरुण नरके यांनी केली.

अरुण नरके म्हणाले, चेतन नरके हे गोकुळ दूध संघात संचालक आहेत. तसेच इंडियन डेअरी असोसिएशनचे ते प्रतिनिधित्व करत असून थायलंड सरकारची ते वाणिज्य सल्लागार आहेत.
दिल्लीच्या लोकसभेत शेतकऱ्यांच्या आवाज उठवणारा खासदार असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून आण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नरके कुटुंबावरील असलेले प्रेम यातून दिसून येणार आहे.

You may also like

error: Content is protected !!