महाराजा यशवंतराव होळकर जयंती महोत्सव 3 डिसेंबरला

महाराजा यशवंतराव होळकर जयंती महोत्सव 3 डिसेंबरला

–  यशवंत सेनेचे  पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे आणि पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सेलचे प्रमुख डॉ.संदीप हजारे यांची माहिती

– दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – स्वरूप तेली)

यशवंत सेना कोल्हापूर शाखेतर्फे दि. 3 डिसेंबर 2022 रोजी महाराजा यशवंतराव होळकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौक येथील मैदानावर होणाऱ्या या मेळाव्याला हजारो समाज बांधव उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यशवंत सेनेचे  पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजेश तांबवे आणि पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय सेलचे प्रमुख डॉ.संदीप हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 याप्रसंगी होळकर घराण्याचे वंशज भूषणराजे होळकर, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.
पत्रकार परिषदेला संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय काळे, जिल्हाध्यक्ष बापू शिरोले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ललिता पुजारी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत वळकुंजे, जिल्हा संघटक संदीप वळकुंजे, कागल तालुका अध्यक्ष उत्तम पाचगावे, योगेश हराळे, दत्ता नेरले उपस्थित होते.
दिवसभर विविध  कार्यक्रमांचे आयोजन
दिवसभर विविध   कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये यशवंतराव होळकर यांच्या जीवनावरील पोवाडा सादरीकरण, समाजाच्या प्रश्नासंबंधी विचारमंथन आणि मार्गदर्शन होणार आहे. समाजातील कर्तुत्वान व्यक्तींना पुरस्कार वितरण आणि गुणवंत युवा वर्गाचा सत्कार आहे. दुपारी चार वाजता महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याची कोल्हापूर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. ढोल वादन, गजनृत्य, धनगरी ओव्या, लेझीमपथक, मर्दानी खेळ हे मिरवणुकीत आकर्षण असणार आहे.

You may also like

error: Content is protected !!