‘आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम- पंचमहाभूत महोत्सव’ बोध चिन्हाचे अनावरण उद्या (शुक्रवारी)
– संयोजन समितीचे शंकर पाटील यांची माहिती
– सायंकाळी ५ वाजता पंचगंगा घाट येथे होणार आंतरराष्ट्रीय ‘सुमंगलम- पंचमहाभूत महोत्सव’ च्या बोध चिन्हाचे अनावरण
– वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी उत्सवाचे आयोजन
– हजारो गोमय पणती प्रज्वलित करून उत्सवाच्या तयारीची मुहूर्तमेढ
– “अनावरण सोहळा” होणार जगभरामध्ये प्रदर्शित
कोल्हापूर : ( “मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).
श्री सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्य्यावातीने २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील *‘सुमंगलम’* या पृथ्वी, पाणी,हवा, तेज,आकाश अशा पंचमहाभूतांच्यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाचे अनावरण पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी व विविध मान्यवरांच्या उपस्थित उद्या *शुक्रवार दि. २५/नोव्हेंबर/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पंचगंगा घाट येथे होणार आहे. अशी माहिती संयोजन समितीचे शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेवेळी शंकर पाटील, डॉ.संदीप पाटील, माणिक पाटील-चुयेकर, डॉ. रवींद्र सिंग, प्रल्हाद जाधव, विक्रम पाटील, विवेक सिद्ध, महेश मास्तोळी, शेखर आजरी, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
*‘सुमंगलम’* लोकोत्सवाला जगभरातून सुमारे ३० लाख लोकांची उपस्थिती : डॉ.संदीप पाटील.
१३५० वर्षापेक्षा अधिक आध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ, कणेरी यांच्य्यावातीने २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावरील *‘सुमंगलम’* या पृथ्वी, पाणी,हवा, तेज,आकाश अशा पंचमहाभूतांच्यावर आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साधारणत: ५०० एकर मध्ये होणाऱ्या या उत्सवाला जगभरातून विविध मान्यवर व सुमारे ३० लाख लोकांची उपस्थिती असणार आहे. तसेच केंद्रीय, राज्य मंत्री, राज्यपाल, शास्त्रज्ञ, तज्ञ व्यक्ती कौन्सिलर आदींचीही उपस्थिती असणार आहे. तसेच शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, शालेय विद्यार्थी, कॉलेज युवक- युवती यांच्यासह पालक वर्गही या लोकोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.
वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी उत्सवाचे आयोजन
या कार्यक्रमाचे परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे स्वरूप असणार आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाचे अनावरण पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी व विविध मान्यवरांच्या उपस्थित *शुक्रवार दिनांक २५/११/२०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पंचगंगा घाट येथे होणार आहे.
हजारो गोमय पणती प्रज्वलित करून उत्सवाच्या तयारीची मुहूर्तमेढ
पर्यावरणाला पूरक अशा हजारो गोमय पणती प्रज्वलित करून या भव्य उत्सवाच्या तयारीची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार आहे. यावेळी पंचमहाभूत तत्वांशी संबंधित सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन व उत्साचे थीम सॉंगचे अनावरण करण्यात येणार आहे .
“अनावरण सोहळा” होणार जगभरामध्ये प्रदर्शित
सदर अनावरण सोहळा जगभरामध्ये फेसबुक लाईव्हच्या (श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ facebook.com/siddhgiri.kolhapur) माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. या उत्सवाच्या बोध चिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे. तरी कोल्हापूरकरांनी या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमात सहभाग नोंदवून पंचगंगा घाटावरील पर्यावरण पूरक आणि भारतीय संस्कृतीला साजेशा अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले.