शालेय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा 2 डिसेंबर पासून
– अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टचे सुभाष देसाई यांची माहिती
– दि.2 ते 6 डिसेंबर 2022 या काळात स्पर्धांचे आयोजन
– सुमारे 400 शाळेतील बालवाडी ते 10 वी पर्यंतच्या मुला-मुलींचा होणार सहभाग
– गेल्या 20 वर्षांपासून जोपासली आहे उपक्रमाची परंपरा
– 1 डिसेंबर 2022 पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक
कोल्हापूर : (“मानस न्युज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शालेय कथाकथन वक्तृत्व स्पर्धा 2 डिसेंबर 2022 पासून सुरू होत आहेत. या स्पर्धा दि.2 ते 6 डिसेंबर 2022 या काळात होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शालेय मुला – मुलींनी 1 डिसेंबर 2022 पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.,अशी माहिती अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टचे सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा आयोजनाची गेल्या 20 वर्षांपासून संस्थेने परंपरा जोपासली आहे. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणच्या शाळेतील सुमारे 400 शाळेतील बालवाडी ते 10 वी पर्यंतच्या मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा, नियम व स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी संयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला संस्थेच्या पूजा देसाई, संध्या देशमुख, सुप्रिया कुलकर्णी, सुरेश डेंगे, विजया खटावकर आदी उपस्थित होते.
– 4 ते 6 वर्षांपर्यंत वयोगटातील कथाकथन स्पर्धा
दि. 2 डिसेंबर रोजी 4 ते 6 वर्षांपर्यंत वयोगटातील (मराठी इंग्रजी शाळा- बालवाडी, ज्युनिअर व सीनियर केजी) मुलांसाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कथाकथनासाठी वेळ 3 ते 5 मिनिटे असून प्रत्येकी दहा रुपये प्रवेश फी द्यावी लागणार आहे. स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्रक व विजेत्यांना 500 रुपये पासून 101 पर्यंतची रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
– दि. 3 व 4 डिसेंबर रोजी इयत्ता 1 ली ते 4 चौथी वयोगट कथाकथन स्पर्धा
यामध्ये पहिली ते दुसरी व तिसरी ते चौथी असे लहान व मोठा दोन गट करण्यात आले आहेत. यातील विजेत्यांना 751 ते 151 रोख रुपये पर्यंतची बक्षिसे व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
– इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वयोगटातील वक्तृत्व स्पर्धा
कै लक्ष्मीबाई देसाई वतृत्व स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात येणार आहेत. यासाठी किमान वेळ अनुक्रमे पाच ते सात व आठ ते दहा मिनिटे असा असणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना 3 हजार रुपयांपासून 351 रुपये रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धा सोमवार दि.5 व मंगळवार दि. 6 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहेत.
– स्पर्धेचे ठिकाण व सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण :-
कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 6 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तसेच सर्व स्पर्धा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत रघुनंदन सांस्कृतिक भवन, क्रशर चौक, राधानगरी रोड कोल्हापूर येथे या सर्व स्पर्धा पार पडणार आहेत.