– दुकानदार, फळ विक्रेते व व्यापाऱ्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा बाजारात सर्रास वापर
– “त्या” दोषी कर्मचारी व व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
“प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी”साठी कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष मोहीम धडाक्यात सुरू केली होती. या अंतर्गत काही दुकानदार व व्यापाऱ्यांवर कारवाईही झाली. मात्र, काही दिवसांनी ही कारवाई फार्सचं ठरल्याने प्लॅस्टिक बंदी कागदावरच राहिली आहे., असा आरोप ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांतून केला जात आहे. तसेच “त्या” दोषी कर्मचारी व व्यापाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरली आहे.
महापालिका प्रशासनातर्फे प्लॅस्टिक बंदी नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे. सध्या मार्केट, बाजारांमधील फळ विक्रेते, दुकानदार व व्यापारी सर्रास बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ह्या बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कुणाच्या अर्थपूर्ण व्यवहाराने सुरू आहे ?, होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेते व्यापारी, व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते व महापालिका प्लास्टिक विरोधी नियंत्रण पथकातील काही कर्मचारी यांच्यात मिली भगत (साठे-लोटे) आहे काय? असा सवालही सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांच्या पाठिंबामुळे काही व्यापारी तर मुक्तपणे या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करताना दिसत आहेत.
विविध प्रसार माध्यमांनी वेळोवेळी याविषयी वृत्त प्रसारित केले आहे. यानंतर संबंधित दोषी व्यापारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामुळे काही होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेते व्यापारी त्यांच्यासमोर प्रसार माध्यम प्रतिनिधी जरी उभे ठाकले तरी ते त्यांना घाबरत नाहीत. काही प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठिंब्यामुळे प्रसार माध्यमांसमोरही ते व्यापारी बेधडकपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करण्याचे धाडस दाखवतात. “त्या” दोशी कर्मचारी व व्यापाऱ्यांची कसून चौकशी करून कठोर कारवाई होणार का ? काय प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा नियम कागदावरच राहणार ? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.
महापालिका प्रशासनातर्फे प्लॅस्टिक बंदी नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे. सध्या मार्केट, बाजारांमधील फळ विक्रेते, दुकानदार व व्यापारी सर्रास बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ह्या बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर कुणाच्या अर्थपूर्ण व्यवहाराने सुरू आहे ?, होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेते व्यापारी, व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते व महापालिका प्लास्टिक विरोधी नियंत्रण पथकातील काही कर्मचारी यांच्यात मिली भगत (साठे-लोटे) आहे काय? असा सवालही सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांच्या पाठिंबामुळे काही व्यापारी तर मुक्तपणे या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करताना दिसत आहेत.
विविध प्रसार माध्यमांनी वेळोवेळी याविषयी वृत्त प्रसारित केले आहे. यानंतर संबंधित दोषी व्यापारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही. यामुळे काही होलसेल प्लास्टिक पिशवी विक्रेते व्यापारी त्यांच्यासमोर प्रसार माध्यम प्रतिनिधी जरी उभे ठाकले तरी ते त्यांना घाबरत नाहीत. काही प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठिंब्यामुळे प्रसार माध्यमांसमोरही ते व्यापारी बेधडकपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करण्याचे धाडस दाखवतात. “त्या” दोषी कर्मचारी व व्यापाऱ्यांची कसून चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई होणार का ? काय प्लास्टिक बंदीच्या कारवाईचा नियम कागदावरच राहणार ? असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.