कोल्हापूर जिल्हा महिला क्रिकेट संघाचा मोठा विजय

– अहमदनगर जिल्हा महिला क्रिकेट संघावर 10 विकेटने मात

– सामन्यात सेजल सुतारचे 4 बळी व परिणीता पाटीलच्या नाबाद 34 धावा.

– महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजीत 15 वर्षाखालील महिला निमंत्रीत स्पर्धा (2022­-23).

कोल्हापूर : (“मानस न्युज 9” विशेष क्रीडा प्रतिनिधी नंदकुमार तेली)

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजीत 15 वर्षाखालील निमंत्रीत महिला क्रिकेट स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा महिला संघाने अहमदनगर जिल्हा महिला संघावर 10 विकेटने मोठा विजय मिळविला.

या सामन्यात कोल्हापुरच्या सेजल सुतारने 4 बळी व परिणीता पाटीलच्या नाबाद 34 धावांची लक्षवेधी खेळी करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने 15 वर्षाखालील निमंत्रीत महिला क्रिकेट स्पर्धेतील सामना पुणे येथे कोल्हापूर जिल्हा महिला संघ विरूध्द अहमदनगर जिल्हा महिला संघ यांच्या मध्ये खेळविणेत आला. हा सामना *कोल्हापूर जिल्हा महिला संघाने 10 विकेटनी जिंकला.

प्रथम फलदांजी करताना अहमदनगर जिल्हा महिला संघाने 19.1 षटकांत सर्व बाद फक्त 58 धावा केल्या. यामध्ये स्वामिनी जेऊरकरने दुहेरी 14 धावा केल्या. कोल्हापूर जिल्हा महिला संघा कडून सेजल सुतारने 4, पर्ल संतानीने 2, श्रावणी पाटील व मधुरा इंगवले यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

उत्तरादाखल खेळताना कोल्हापूर जिल्हा महिला संघाने 6.3 षटकांत बिनबाद 62 धावा आरामात केल्या. यामध्ये परिणीता पाटील नाबाद 34 व तनिष्का माळी नाबाद 9 धावा केल्या. अशा प्रकारे कोल्हापर जिल्हा महिला संघाने 10 विकेटनी मोठा विजय मिळविला.

You may also like

error: Content is protected !!