कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा “किक ऑफ” ४ डिसेंबरला
– कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांची माहिती
– केएसए “ए” डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा (2022-23).
– 16 संघांची 348 खेळाडूंसह नोंदणी पूर्ण
– परदेशी 24, राष्ट्रीय 21 तर स्थानिक व जिल्ह्यातील ३०३ खेळाडूंचा समावेश
– दोन गटातील 16 संघात एकूण
होणार 56 सामने : दररोज होणार दोन सामने
– “फिफा फुटबॉल वर्ल्डकप” कतारमध्ये तर “फिवर कोल्हापुरात”
– फुटबॉल प्रेमींमध्ये सामने पाहण्याची उत्सुकता शिगेला
– हंगामात अव्वल ठरण्यासाठी व दर्जेदार खेळासाठी मजबूत संघ बांधणीवर भर
कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” : विशेष क्रीडा प्रतिनिधी नंदकुमार तेली)
कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वातील फुटबॉल खेळाडूंसह प्रेमींना प्रतीक्षा लागून राहिलेल्या फुटबॉल हंगामाच्या “किक ऑफ” चा मुहूर्त ठरला. छत्रपती शाहू स्टेडियम येथील फुटबॉल मैदानावर 4 डिसेंबर 2022 रोजी पासून केएसए “ए” डिव्हिजन लीग (2022-23) स्पर्धेतील सामन्यांनी होत आहे. या केएसए “ए” डिव्हिजन लीग अंतर्गत खेळणाऱ्या 16 संघांची 348 खेळाडूंसह नोंदणी पूर्ण झालेली आहे., अशी माहिती केएसए ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
– परदेशी 24, राष्ट्रीय 21 तर स्थानिक व जिल्ह्यातील ३०३ खेळाडूंचा समावेश
यामध्ये परदेशी 24 खेळाडूंचा, देशातील विविध राज्यांतील (राष्ट्रीय) 21 खेळाडूंचा तर कोल्हापूर जिल्ह्यातील (स्थानिक) ३०३ खेळाडूंचा समावेश आहे.
– दोन गटातील 16 संघात एकूण
होणार 56 सामने
सीनियर सुपर ८ तर सीनियर ८ अशा संघांची नोंदणी झाली असून या दोन गटात अंतर्गत एकूण 56 सामने होणार आहे. के एस ए लीग स्पर्धेत दररोज दोन सामने होणार आहेत.
– 15 नोव्हेंबर 2022 रोजी होता खेळाडूंसाठी विलंब नोंदणीचा शेवटचा दिवस.
सुपर सिनिअर व सिनिअर (ए डिव्हिजन) संघ व खेळाडू नोंदणी अशी : –
पाटाकडील तालीम मंडळ 22.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब 22.
श्री शिवाजी तरुण मंडळ 22.
दिलबहार तालीम मंडळ 22.
////////////////////////////////.
बी जी एम स्पोर्ट्स 22.
बालगोपाल तालीम मंडळ 22.
संयुक्त जुना बुधवार पेठ 22.
खंडोबा तालीम मंडळ-अ 22.
————————————-
कोल्हापूर पोलीस फु.संघ 19.
फुलेवाडी फुटबॉल क्री.मं. 22.
ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ 22.
झुंजार क्लब 22.
///////////////////////////////.
सम्राट नगर स्पोर्ट्स 22.
उत्तरेश्वर प्रा.वा.ता.म. 22.
संध्यामठ तरुण मंडळ 22.
रंकाळा तालीम मंडळ 22.
– 15 नोव्हेंबर 2022 अखेर 348 खेळाडूंची नोंदणी पूर्ण
के.एस.ए.कडे दि. 15 नोव्हेंबर 2022 अखेर 348 खेळाडूंची नोंदणी विविध संघांमध्ये झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 303, देशातील विविध राज्यातील 21 तर परदेशी 24 खेळाडूंची नोंदणी झाली आहे.
– “फिफा फुटबॉल वर्ल्डकप” कतारमध्ये तर “फिवर कोल्हापुरात”
सध्या कतारमध्ये “फिफा फुटबॉल वर्ल्डकप – 2022” सुरू असल्यामुळे कोल्हापूर मधील वातावरण फुटबॉलमय बनले आहे. या फुटबॉल प्रेमींच्या फुटबॉल खेळाच्या “फिवर”मुळे
कोल्हापूर मधील फुटबॉल प्रेमींमध्ये गल्ली-बोळात फक्त फुटबॉल खेळाचीच चर्चा रंगली आहे. “फिफा फुटबॉल वर्ल्डकप” कतार मध्ये तर “फिवर कोल्हापूर”मध्ये असे चित्र निर्माण झाले आहे. तसेच सीनियर संघांनी आपल्या आवडीचा संघ व खेळाडू निवडले आहेत. निवडलेल्या संघांमध्ये आपल्या संघाची प्रतिमा पहात आहेत.
त्या आवडत्या संघातील खेळाडूंचे स्टार खेळाडूंचे भव्य डिजिटल शहरातील प्रमुख चौका चौकांमध्ये उभारले आहेत.
हे डिजिटल सध्या लक्षवेधी ठरत असून संपूर्ण शहरच फुटबॉलमय बनले आहे.
– हंगामात अव्वल ठरण्यासाठी मजबूत संघ बांधणीवर भर
कोल्हापुरातील सुपर सीनियर व सीनियर संघांनी हंगामात अव्वल स्थान पटकाविण्यासाठी मजबूत संघ बांधणी केली आहे. दर्जेदार खेळ व्हावा यासाठी या सर्व संघांनी परदेशी, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील खेळाडूंना
लाखो रुपयांचा खर्च करून करारबद्ध केले आहे. तसेच शहरातील व जिल्ह्यातील स्टार खेळाडूंचा यामध्ये समावेश असणार आहे. यामुळे मजबूत संघ बांधणी झाली आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल विश्वातील यंदाच्या हंगामात पेठा-पेठांमधील इर्शा व दर्जेदार खेळ जेष्ठ-सिनिअर फुटबॉलपटू, फुटबॉल प्रेमी, समर्थकांना पहावयास मिळणार आहे.
– फुटबॉल प्रेमींमध्ये सामने पाहण्याची उत्सुकता शिगेला
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून फुटबॉल हंगामाला ब्रेक लागला होता. यंदाच्या वर्षी कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे पुन्हा फुटबॉल हंगाम सुरू होत आहे. सध्या कतारमध्ये “फिफा फुटबॉल वर्ल्डकप – 2022” सुरू असून संपूर्ण शहरच फुटबॉलमय बनले आहे. यामुळे फुटबॉल प्रेमींमध्ये केएसए “ए” डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेतील सामने पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.