कोल्हापूर : (” मानस न्यूज 9″ – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा 15 वर्षाखालील महिला संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित एक दिवसीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे येथे रवाना झाला.
हा संघ पुणे येथे अहमदनगर, सोलापूर व एमसीए इलेव्हन या संघाची 23 ते 25 नोव्हेंबर 2022 या काळात साखळी सामने खेळणार आहे.
पुणे येथे रवाना झालेला संघ असा
कर्णधार रसिका शिंदे, परिणीता पाटील, तनिष्का माळी, सेजल सुतार, वृंदा मेढे – पवार, मधुरा इंगवले, पर्ल संतांनी, प्राची कांबळे, ईश्वरी राणे, सारा जाधव, निष्का चौगुले, श्रावणी पाटील, जानवी चौगुले व संघ व्यवस्थापक विनोद कोपद.