“झुंबा डान्स” मुळे मिळतो “व्यायाम व आनंद”

– राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सावर्डेकर यांचे प्रतिपादन

– झुंबा डान्स वर्कशॉप उत्साहात : महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– स्नेहा कुलकर्णी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. यात टिकून राहण्यासाठी वेगाला महत्त्व आले आहे. यामुळे जीवनशैलीच बदलून गेली असून आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी व्यायाम व आनंद महत्वाचा आहे.
मनोरंजनात्मक “झुंबा डान्स” मुळे व्यायामासह आनंदही मिळतो., असे प्रतिपादन लिंगायत समाज संस्था अंतर्गत राणी चन्नम्मा महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री संतोष सावर्डेकर यांनी केले. राणी चन्नम्मा महिला मंडळातर्फे दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ येथे शुक्रवारी (दि . १८ नोव्हेंबर २०२२) रोजी “झुंबा डान्स” हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.

– डान्सच्या माध्यमातून होतो सर्वांगाचा व्यायाम : अध्यक्षा राजश्री सावर्डेकर

यावेळी बोलताना अध्यक्षा राजश्री सावर्डेकर म्हणाल्या, सध्याच्या ताणतणाव ,धावपळ ,धकाधकीच्या जीवनात महिलांना आरोग्यांसह आनंद मिळावा. यासाठी “झुंबा डान्स” हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यापूर्वी महिलावर्ग लांब अंतरावरून पाणी आणणे , कपडे, भांडी धुणे, जात्यावर धान्य दळणे, पाटा वरवंट्यावर मसाला बारीक करणे, शेतातील कामे, धारा काढणे आदी विविध कामांमुळे महिलांच्या शरीराची हालचाल होऊन अप्रत्यक्षरीत्या व्यायाम होऊन आरोग्य चांगले राहायचे. मात्र, सध्या घरगुती कामांसाठी अद्ययावत मशीनरी उपलब्ध असल्यामुळे नैसर्गिक हालचाल, चालणे, कष्टाची कामे व पर्यायाने व्यायामच थांबला आहे. व्यायामाच्या माध्यमातुन आरोग्य चांगले ठेवणारी आणि आनंद देणारी गोष्ट म्हणजे झुंबा डान्स. या डान्सच्या माध्यमातून सर्वांगाचा व्यायामही होतो. त्यासाठी झुंबा डान्स हा उत्तम पर्याय आहे. महिला वर्गामध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशानेही “झुंबा डान्स” उपक्रम राबविण्यात आलेला असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

– स्नेहा कुलकर्णी यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण

प्रशिक्षिका स्नेहा कुलकर्णी यांनी उपक्रमात सहभागी सर्व महिलांना *झुंबा एरोबिक्स डान्स* चे *तंत्रशुद्ध प्रशिक्षण* दिले. तसेच मेंटेन राहण्यासंदर्भात महत्वपूर्ण *टीप्स देऊन विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन मार्गदर्शनही* केले. या उपक्रमात महानंदा पाटील, मंदाकिनी तंबाके , शिल्पश्री सावर्डेकर , विजयालक्ष्मी पाटील, शुभांगी चितारी आदींसह समाजातील महिलावर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून “झुंबा डान्स” चा आनंद घेतला. तसेच उपक्रमाचे कौतुक केले.

You may also like

error: Content is protected !!