– जिल्हाध्यक्ष विजयकुमार कदम यांचा पत्रकार परिषदेत इशारा
– गारगोटी एस टी बस स्थानकातील नूतनीकरणाचे काम वर्कऑर्डर प्रमाणे नसल्याचा आरोप
– “त्या” कामा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
कोल्हापूर : (मानस न्यूज 9 – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)
गारगोटी एस टी बस (आगार) स्थानकातील नूतनीकरणाचे काम वर्कऑर्डर प्रमाणे नसल्यामुळे “त्या” कामा संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी पतीत पावन संघटना कोल्हापूर जिल्हा व भुदरगड तालुका यांच्यावतीने करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास टप्प्या-टप्प्याने आंदोलन तीव्र करून 16 नोव्हेंबरला “चक्काजाम” करण्याचा इशारा संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष विजयकुमार परशराम कदम यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी बोलताना कदम म्हणाले, वर्कऑर्डर प्रमाणे काम व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनासह गारगोटी बस स्थानक प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. यासाठी संघटनेतर्फे लाक्षणिक धरणे आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला होता. तसेच 09 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. तरीसुद्धा जाणीवपूर्वक या कामा संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष अधिकारी व ठेकेदार करत असल्यामुळे त्यांच्यावर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास बुधवार दि. 16 नोव्हेंबर 2022 रोजी गारगोटी बस स्थानक येथे डिजिटल फलकाद्वारे संबंधित अधिकारी यांच्या नावानिशी कामासंदर्भातील माहिती जनतेसमोर जाहीर करण्यात येणार आहे. तसेच चक्काजाम व रस्ता रोको असे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कदम यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला कोल्हापूर उपजिल्हाध्यक्ष प्रशांत जामदार, दशरथ बागडी, मनीष सलगर, अमोल केंगार, अनिल जामदार, सचिन देसाई, सिद्धांत वरपे , बजरंग वर्पे, विनायक पवार, रंगराव पाटील, वैशाली झांजगे, लता नार्वेकर , अंकिता हेबाळकर आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या व उपस्थित करण्यात आलेले प्रश्न
M20 काँक्रीटची मिक्स डिझाईन पत्र, सर्च आरसीसी कामाचे टेस्ट रिपोर्ट, सर्व फरशी इतर मटेरियल चे टेस्ट रिपोर्ट, स्टोन प्लंबिंग चे कोटेशन व काम, तसेच ठेकेदार यांनी सादर केलेली बिले महामंडळाच्या पत्रावर कशी ?, टॉयलेट साठी बसवलेले वॉश बेसिन किती ? कोणत्या कंपनीचे कॉक बसविण्याची बिले अदा केली? रिटेलिंग वॉल कोणत्या ठिकाणी केली आहे व का? (m20 दर्जाच्या काँक्रीट मध्ये).