राज्य बेसबॉल (मुली) संघ प्रशिक्षकपदी सुनीता नाईक

– सध्या त्या गडहिंग्लज येथील साधना हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत

– समराला लुधियाना (पंजाब) येथे
दि. ३ ते ८ नोव्हेंबर २०२२ या काळात होणार २९ वी सब ज्युनिअर नॅशनल बेसबॉल स्पर्धा

कोल्हापूर : (“मानस न्यूज 9” – विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

कोरोना नंतर प्रथमच राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाणार असून महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षका (कोच) म्हणून गडहिंग्लज येथील साधना हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका सुनिता संजय नाईक यांची निवड झाली आहे.

पंजाब येथे राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन

समराला लुधियाना (पंजाब) येथे
२९ वी सब ज्युनिअर नॅशनल बेसबॉल स्पर्धा दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजीपासून सुरु होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र बेसबॉल संघ (मुली) सहभागी होणार आहेत.

राज्य संघ प्रशिक्षकपदी निवडीचे पत्र महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर यांचेकडून त्यांना प्राप्त झाले आहे. या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, सचिव राजेंद्र बनसोडे यांचे तसेच साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक जे बी बारदेसकर,संचालक अरविंद बारदेसकर, मुख्याध्यापक जीएस शिंदे, पर्यवेक्षक आर एन् पटेल यांचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

कोरोनानंतर प्रथमच सब ज्यु. नॅशनल बेसबॉल स्पर्धा

कोरोनानंतर प्रथमच २९ वी सब ज्युनिअर नॅशनल बेसबॉल स्पर्धेचे आयोजन समराला लुधियाना (पंजाब) या ठिकाणी दि. ३ ते ८ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान करण्यात आलेले आहे .

You may also like

error: Content is protected !!