कोल्हापूर : कागल येथील बबनराव शंकर बनछोडे (वय ८३)यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते सेवानिव्रुत्त शिक्षक होते. कागल तालुका तेली समाजाचे ते माजी अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा तेली समाजाचे माजी उपाध्यक्ष होते. कागल येथील वीरशैव लिंगायत समाज शिवमंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. मंदिरातील शिवलिंग व नंदी त्यांनीच अर्पण केले होते. आडी दत्तमंदिरात त्यांनी चांदीची उत्सवमूर्ती अर्पण केली होती. त्यांच्या मागे मुलगा,दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दै. पुढारीचे व्रुत्तसंपादक सचिन बनछोडे यांचे ते वडील होत.
previous post